नदी, विहिरीत गणरायाचे विसर्जन करू नये

शासनाच्या आदेशानुसार, व पिंपरी चिंचवड आयुक्तालय दोनच्या सूचनेनुसार सार्वजनिक तळी, नदी, विहीर याठिकाणी श्री गणरायाचे विसर्जन करू नये असे आवाहन केले असून या ठिकाणी विसर्जन करून कायद्याचा भंग करणाऱ्या गणेशभक्तावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.

अमरनाथ वाघमोडे यांचे गणेश भक्तांना आवाहन

तळेगाव दाभाडे: शासनाच्या आदेशानुसार, व पिंपरी चिंचवड आयुक्तालय (pimpri chinchwad commissioner office) दोनच्या सूचनेनुसार सार्वजनिक तळी, नदी, विहीर याठिकाणी श्री गणरायाचे विसर्जन ( Ganesh Immersion) करू नये असे आवाहन केले असून या ठिकाणी विसर्जन करून कायद्याचा भंग (Breach of law) करणाऱ्या गणेशभक्तावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.

सर्व घडामोडीचे व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार
वाघमोडे म्हणाले की, तळेगाव शहर परिसरामध्ये सातव्या दिवशी श्री गणरायाचे विसर्जन होत असते. त्यास अनुसरून कायदा आणि शिस्त याचे पालन व्हावे म्हणून तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे ९ वरिष्ठ अधिकारी, ७० कर्मचारी तसेच १ एसआरपी प्लॉटून अशी विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी व्यवस्था केलेली आहे. विसर्जन काळात कोणी कायद्याचा भंग करू नये म्हणून रेकॉर्डवरील २२ गुन्हेगारांना तातपुरते तडीपार केले आहे. तसेच गावतळे, बनेश्वरतळे, तळेगाव स्टेशन येथील तळे, इंद्रायणी नदी आदी ठिकाणी गणेश भक्तांनी विसर्जन करू नये म्हणून त्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर एसआरपीचा बंदोबस्त ठेवला आहे.
कायद्याचा भंग करणाऱ्यावर कारवाई होणार
श्री गणरायाचे विसर्जन सकाळी सुरू करून सायंकाळी सूर्यास्ताच्या आत गणेश भक्तांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी पूर्ण करावे. असे आवाहन करण्यात आले असून या सर्व घडामोडीचे व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये काही अडचण आल्यास मदत करणार आहे. परंतु कायद्याचा भंग करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिला आहे.