घोडेगाव पोलीस ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन

घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाणेला आयएसओ ९००१-२०१५ स्मार्ट पोलीस मध्ये ए प्लस प्लस ग्रेट हे पुणे जिल्हयातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांना देऊन गौरविण्यात आले.

भिमाशंकर  : घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाणेला आयएसओ ९००१-२०१५ स्मार्ट पोलीस मध्ये ए प्लस प्लस ग्रेट हे पुणे जिल्हयातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांना देऊन गौरविण्यात आले.  

७४ वा भारतीय स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधुन विधान भवन कौन्सिल हॉल पुणे येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवटे, पोलीस अधिक्षक संदिप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, खेड आंबेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे आदि अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी घोडेगाव पोलीस ठाणेचा चेहरामोहरा बदललेला आहे. यामध्ये गुनवत्तापुर्ण सेवा, पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांसाठी अनुकुल बनविणे, पोलीसिंग मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, जलद प्रतिसाद, सतर्कता व जबाबदारपणा, पोलीस वर्तनात सकारात्मक बदल घडवून सामान्य जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे आदि निकषावरून सदरचे आयएसओ नामांकन देण्यात आले. 

सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, पोलीस हवालदार शंकर तळपे, दिपक काशिद, संदिप लांडे, दिलीप वाघोले, राजाराम भोगाडे, युवराज भोजणे, अलका किर्वे, मनिषा तुरे, राजेश तांबे, काशिनाथ गरुड, दत्तात्रय जढर, अमोल काळे, रेखा बोटे, मंगल शिंदे आदि पोलीस कर्मचा-यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.