सातारा : सातारा शहरातून दुचाकीवरून डबलसीट जाताय तर तुम्हाला त्याची भरपाई भरावी लागेल. कोरोना वाढलाय , घरात थांबा, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखा असे वेळोवेळी सरकार, पोलीस प्रशासन , जिल्हा प्रशासन नागरिकाना सांगत आहेत मात्र तरी लोक सगळ्या सूचना धाब्यावर बसवत आहेत. आता या लोकांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढविली.

शहरात डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच पोलीस अशा लोकांना अडवत आहेत मात्र कागद्पत्रांची  मागणी न करता त्यांना गुडघ्यावर खाली बसून  गाडीचा फोटो घेत होते. त्यांना काहीही न बोलता त्याला सोडून दिले जात होते. दुचाकीस्वारांनाही आश्चर्य वाटत होते मात्र पुढे गेल्यावर काही वेळातच संबंधित दुचाकीस्वाराला ई-चलनाचा दंड आकारल्याचा एसएमएस आल्यानंतर दुचाकीस्वाराला  त्याची चूक आणि पोलिसांच्या कृतीचा अर्थ समजला.  ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता पोवई नाक्यावर  सुरुवात केली.नाक्यावर  रात्री उशिरापर्यंत १ हजार ५४४ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई करत  यातून ५ लाख ३८ हजारांचा दंड वसूली  केली. हा ई-चलनाचा दंड दोनशे –  पाचशे अशा स्वरूपात आकारण्यात आला आहे