corona

पुणे : पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड मध्ये देखील कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. लॉक डाऊन केल्यानंतर देखील कोरोनाची साखळी तुटत नसल्याने आरोग्य विभागामध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे : पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड मध्ये देखील कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. लॉक डाऊन केल्यानंतर देखील कोरोनाची साखळी तुटत नसल्याने आरोग्य विभागामध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे शहरात एका दिवसात २४ जणांचा बळी गेला आहे तर १०१२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

कोरोनाचा  वाढता कहर लक्षात घेतला पालिका प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहराचा पुन्हा एकदा रेडझोन मध्ये समावेश केला आहे. आतापर्यंत शहरात कोरोनाबाधितांची संख्या २६११८ वर पोहचली असून १७६७३ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असं आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहेत.