जम्बाे रुग्णालयाला निधी देणार नाही असे म्हणालाेच नाही – हेमंत रासने

पुणे : काेराेना नियंत्रित करण्यासाठी जम्बाे रुग्णालयास निधी देणार नाही असे मी म्हणालाेच नाही, या रुग्णालयाला राज्य सरकारनेही पैसे द्यावेत अशी मागणी केली हाेती असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : काेराेना नियंत्रित करण्यासाठी जम्बाे रुग्णालयास निधी देणार नाही असे मी म्हणालाेच नाही, या रुग्णालयाला राज्य सरकारनेही पैसे द्यावेत अशी मागणी केली हाेती असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात काेराेना स्थितीच्या आढावा बैठकीत पुणे जिल्ह्यातील काेराेनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तीन जम्बाे रुग्णालये उभी करण्याचे निर्देश दिले हाेते. या रुग्णालयास पुणे महापािलका निधी देणार नाही अशी भुमिका सत्ताधारी भाजपकडून घेतली गेली हाेती. याविराेधात विराेधी पक्षांनी जाेरदार टिका केली. तसेच सध्या शिवाजी रस्त्यावर या विराेधात  फलकही झळकू लागले आहेत. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमानंतर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रासने यांनी याविषयाची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘ जम्बाे रुग्णालयास महापािलका निधी देणार नाही असे म्हणालाेच नव्हताे. राज्य सरकारने या रुग्णालयाकरीता निधी द्यावा आणि महापािलका देखील त्यांच्या वाट्याची रक्कम देईल असे माझे पहील्यापासूनच म्हणणे आहे. काेराेनाच्या पार्श्वभुमीवर महापािलकेने अात्तापर्यंत दाेनशे ते अडीचशे काेटी रुपयांचा खर्च केला आहे. काेराेनाचे निर्मलून हाेइपर्यंत सर्व व्यवस्था सुरूच ठेवणार आहे. महापािलका जम्बाे रुग्णालयास पैसे देणार आहे. राज्य सरकारनेही या रुग्णालयास द्यावे ही माझी मागणी कायम आहे. महापािलका काेणतीही व्यवस्था कमी करणार नाही. महापािलका अद्ययावत रुग्णालय उभे करण्यासाठी प्रयत्नात आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे.’’ असे रासने यांनी नमूद केले.
केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे पैसा मागत आहे. केंद्राकडून पैसा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू, महापािलकेला निधी कमी पडत असेल तर महापािलकेला मदत करावी असेही रासने यांनी सांगितले. काेण या प्रकरणात राजकारण करत आहे, याचा शाेध माध्यमांनीच घ्यावा, राज्य सरकारला केंद्राकडून वस्तुरुपात मिळालेल्या मदतीतुन महापािलकेला मदत मिळायला हवी असेही ते म्हणाले.