महामार्गावर चोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी टेम्पो चालकाचे  पळवले ३० लाख रुपये

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ शनिवारी (ता. २९) रात्री आठच्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या मालवाहू टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला असता दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकी आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी टेम्पो चालकाशी झटापट करून ३० लाख रूपये असलेली बॅग घेऊन फरार(robbery) झाले.

रावणगाव : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ शनिवारी (ता. २९) रात्री आठच्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या मालवाहू टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला असता दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकी आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी टेम्पो चालकाशी झटापट करून ३० लाख रूपये असलेली बॅग घेऊन फरार(robbery) झाले.

पुण्याकडून सोलापूरकडे एका कंपनीचा मालक आणण्यासाठी जाणाऱ्या मालवाहू टेंम्पो (एमएच १२ एफसी ७७९९)) चालक लघुशंकेसाठी खाली उतरला तेवढ्यात पैशाची बॅक दोन काळया रंगाच्या पल्सरवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी पळविली. यासंदर्भात दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सुरक्षेयंत्रणेदारे त्वरित मेसेज देऊन मळद हद्दीतील वृध्दावन हाॅटेलजवळ वेंकिज चिकन कंपनीच्या टेम्पोतून काळया रंगाच्या दोन पल्सर गाडयावरून आलेल्या चार व्यक्तींनी ३० लाख रूपयांची बॅग पळविले असून सदर व्यक्ती बोरीबेल, भागवतवस्ती, रावणगाव परिसराकडे गेल्या आहेत. या संशयीत दुचाकी व व्यक्ती अढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टेम्पोचालक व चोरटय़ांमध्ये झालेल्या झटापटीत चालक किरकोळ जखमी झाला आहे.