maharashtra corona cases

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्येने त्रिशतकाचा टप्पा पार केला असुन रूग्ण संख्या ३१७ वर पोहोचली आहे. गेल्या चोविस तासांत ४० रूग्ण आढळून आहेत.

गेल्या चोविस तासांत ४० रूग्ण आढळून आले

 

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्येने त्रिशतकाचा टप्पा पार केला असुन रूग्ण संख्या ३१७ वर पोहोचली आहे. गेल्या चोविस तासांत ४० रूग्ण आढळून आहेत. २०३ रूग्ण बरे झाले असून १०९ रूग्णांवर उपचार चालू आहे. तर उपचारादरम्यान पाच व्यक्तिंचा मृत्यु झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितली.  

तालुक्यात शनिवार (दि.१) रोजी ७ रूग्ण आढळले यामध्ये मंचर २ जण, कुरवंडी, अवसरी खुर्द, चास, पारगांवतर्फे अवसरी, शिनोली प्रत्येकी एक. तर रविवारी (दि.२) रोजी रात्री ३३ जणांचा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला, यात घोडेगाव ११ जण, पिंपळगाव घोडे ७, गावेडवाडी ४, शिनोली, अवसरी बुद्रुक, काळेवाडी-दरेकरवाडी व मंचर प्रत्येकी दोन तर काठापुर, पारगाव तर्फे अवसरी, थुगाव प्रत्येकी एक, असे एकंदरीत या गावांत चोविस तासांत ४० रूग्ण आढळून आले. यातील बहुतेक रूग्ण पहिल्या रूग्णांच्या संपर्कातील आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. तर अवसरी, भिमाशंकर आयुर्वेद मंचर, पिंपरी, तळेगाव, वडगाव मावळ, पुणे या हॉस्पिटमध्ये १०९ जणांवर उपचार चालू आहे.  

-नागरिकांनी घराबाहेर पडू नये

नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अन्यथा पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.

 जुन्नर व आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जुन्नर, आंबेगावच्या प्रभारी प्रांत रमा जोशी यांनी केले.