वाघोली प्रा. आ. केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवण्याची मनसेची मागणी

वाघोली : (ता. हवेली) वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गावांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर कर्मचारी संख्या वाढवावी व सोयी सुविधा द्याव्यात अशी लेखी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनसेची निवेदनाद्वारे मागणी; अन्यथा आंदोलन
वाघोली : (ता. हवेली) वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गावांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर कर्मचारी संख्या वाढवावी व सोयी सुविधा द्याव्यात अशी लेखी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांना देण्यात आले आहे.
वाघोली (ता. हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून भविष्यात देखील त्यावर नियंत्रण मिळवणे जिकरीचे काम होणार असून सदर बाब गांभीर्याने घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मांजरी व कोलवडी या गावांमध्ये रुग्ण संख्या अधिक वाढली आहे. परंतु सदर गावे रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी कर्मचारी संख्या व सोयी सुविधांचा अभाव, कर्मचारी संख्या वाढवून सोयी सुविधा पुरवण्यात यावी अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. यावेळी मनसे विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड. गणेश म्हस्के पाटील, जनहित कक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष हितेश बोऱ्हाडे, संघटक सुमित गायकवाड, विभागाध्यक्ष वैभव कुंभार उपस्थित होते.