खजिना विहीर मंडळांच्या ‘सामाजिक उत्सवाला’ प्रारंभ

गणेशोत्सव व दहीहंडीसारखे सार्वजनिक उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात साजरे न करता सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळ सामाजिक उत्सव साजरा करीत आहे.

दहीहंडी, गणेशोत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमांना

पुणे : गणेशोत्सव व दहीहंडीसारखे सार्वजनिक उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात साजरे न करता सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळ सामाजिक उत्सव साजरा करीत आहे. सदाशिव पेठेत ५ हजार मास्क व सॅनिटायझर वाटपाला सुरुवात करुन या उत्सवाचा प्रारंभ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकातील विठ्ठल मंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात मास्क व सॅनिटायझर परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आले. उत्सवसमितीचे अध्यक्ष ओम सुरेश कासार, आशिष कोकाटे यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, डी.वाय.एस.पी. योगेश फडतरे, पोलीस कर्मचारी सोमनाथ ढगे, निता रजपूत, श्री कासार, विनोद लोखंडे, स्वप्निल शिर्के, भरत पवार, पप्पू गोरे, विशाल लोखंडे, सौरभ मेथे, ओंकार बनसोडे, निखिल साळवी आदी यावेळी उपस्थित होते.