उद्यापासून सुरू होणार मॉल्स, गेस्ट हाऊस….. जाणून घ्या नवीन नियमावली

पुणे : नवीन नियमांसह उद्यापासून पुण्यात मॉल्स, लॉज, गेस्ट हाऊस, मार्केट, कॉम्प्लेक्स सुरू करण्यात येणार आहे. मॉलमध्ये मुलांसाठी खेळण्याची जागा आणि गेम परिसर पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर मॉलमधील सिनेमागृह, फूड कोर्ट, रेस्टॉरंट नागरिकांसाठी बंद असतील. मात्र फूड कोर्ट, रेस्टॉरंटमधील तयार पदार्थ घरपोच सेवा देता येणार आहेत.

या नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेल, लॉज, अतिथीगृह पूर्ण बंद राहतील, तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय ३३ टक्के क्षमतेने सुरु होतील. सर्व व्यावसायिकांनी दर्शनी भागात कोव्हिड सूचना फलक लावावेत. व्यावसायिकांनी हॉटेल पार्किंग आणि आवारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

तसेच ज्या नागरीकांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसत नाही अशाच व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. आरोग्य सेवा अँप वापरणे प्रत्येकास बंधनकारक करावे.  वारंवार वापरण्यात येणाऱ्या गोष्टींचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे. 

प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे. मॉल्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, मार्केट यांच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग व्यवस्था करावी, अशाही सूचना केल्या.

ग्राहकांसाठी सॅनिटायझर तसेच कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे उपलब्ध करून देण्यात यावे. ग्राहकांचे  ओळखपत्रासह प्रवासाची माहिती घेण्याचे देखील नियमात नमूद केले आहे. जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारांवर लक्ष केंद्रित करावे. 

ग्राहक हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर खोलीतील सर्व पडदे, चादर आणि इतर गोष्टी त्वरित बदलाव्यात. संबंधित रुम २४ तासांसाठी रिकामी ठेवावी. आवारातील स्वच्छतागृह, पिण्याचे पाण्याचे ठिकाण, हात धुण्याचे ठिकाण आणि इतर परिसरात निर्जंतुक करण्याची सूचना करण्यात आली.

प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर मॉल सुरु राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील मॉल बंदच राहणार आहेत. दोन व्यक्तींमधील सहा फुटाचे अंतर बंधनकारक आहे. मास्क आवश्यक असून हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबणाची व्यवस्था करण्याचे निर्देश आहे.