सातारा, कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के ; भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल

यापूर्वी ८ मे रोजीही साताऱ्यात भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले होते. दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी कोयना परिसरात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. हा धक्का २.८ रिश्टर स्केल इतका होता. त्यानंतर अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरानं येथे दुसरा धक्का बसला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.

    पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील काही भागांत सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे. कोयनापासून अवघ्या १० किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. परंतु, सौम्य धोका असल्यामुळं कोणतीही हानी झालेली नाही.

     

    दरम्यान, यापूर्वी ८ मे रोजीही साताऱ्यात भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले होते. दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी कोयना परिसरात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. हा धक्का २.८ रिश्टर स्केल इतका होता. त्यानंतर अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरानं येथे दुसरा धक्का बसला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.