भाजप पदाधिकाऱ्यांचे दूध बंद आंदोलन

कर्जत : आज (दि : १) रोजी चांदे बुद्रुक येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने दूध बंद आंदोलन करून गोरगरिबांना दूध वाटप करण्यात आले व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला त्यावेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव (देवा) राऊत यांनी दुधाला ३० रुपये भाव व दहा रुपये अनुदान मिळावे.

कर्जत : आज (दि : १) रोजी चांदे बुद्रुक येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने दूध बंद आंदोलन करून गोरगरिबांना दूध वाटप करण्यात आले व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला त्यावेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव (देवा) राऊत यांनी दुधाला ३० रुपये भाव व दहा रुपये अनुदान मिळावे. तसेच आघाडी सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा दिल्या या वेळी चांदे बुद्रुक येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी अनिल सूर्यवंशी, भाऊसाहेब गावडे,नंदकुमार नवले, अरुण लामटुळे (मा.सरपंच) योगेश नवले (सा.कार्यकर्ते),दत्ता मुळे, शहाजी तुपे, रामदास रुईकर, हनुमंत गावडे, राजू शिंगाडे ,तसेच सचिन पोटरे (अहमदनगर जिल्हा भाजपा प्रसिद्धी प्रमुख) नामदेव राऊत ( प्रथम नगराध्यक्ष कर्जत)ज्ञानदेव लष्कर (तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष), संपत बावडकर (सर), हरिदास केदारी, शेखर खरमरे ,राहुल गांगर्डे ,रावसाहेब गांगर्डे ,अरविंद नांगरे, बाळासाहेब राऊत (वालवड ).या सर्व मान्यवरांनी घोषणा देऊन चर्चा केली. जर लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र व उग्र केले जाईल असे जाहीर आव्हान करण्यात आले. यावेळी मिरजगाव पोलीस स्टेशनचे रविंद्र नानासाहेब वाघ यांनी चोक बंदोबस्त देऊन आंदोलन सोशल डिस्टन्स मध्ये शांततेत पार पडले.