पुण्यात राबविण्यात येणार मिशन झिरो

मालेगाव आणि धारावी मध्ये यशस्वी ठरलेला मिशन झिरो उपक्रम आता पुण्यात राबविण्यात येणार आहे. कोरोना ला हरविण्यासाठी पालिका प्रशासनाचे आतोनात प्रयत्न सुरू आहेत. तरीही कोरोनाचे सावट दिवसोंदिवस वाढत चालले आहे.

पुणे : मालेगाव आणि धारावी मध्ये यशस्वी ठरलेला मिशन झिरो उपक्रम आता पुण्यात राबविण्यात येणार आहे. कोरोना ला हरविण्यासाठी पालिका प्रशासनाचे आतोनात प्रयत्न सुरू आहेत. तरीही कोरोनाचे सावट दिवसोंदिवस वाढत चालले आहे. यासंदर्भात नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकही पार पडली. शहरात सर्वाधिक रोज साधारण पाच ते सहा हजार टेस्ट केल्या जात आहे त्याचबरोबर ट्रेसींगवर भर देण्यात आला.

या मिशन अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण शोधणे. तसेच शहरात फिरत्या दवाखान्याची संख्या वाढवणे. चाचणी केलेल्या नागरिकांचे लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचणे  आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचे कार्य केले जाणार आहे. या मिशनमुळे कोरोना विषाणू संसर्गाला आटोक्यात आणण्याचा एक प्रयत्न पालिका प्रशासाकडून केला जाणार आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख पाच हजार ५२३ वर पोहोचली आहे. यापैकी ७६ हजार ७२६  उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.