‘सिडबी’तर्फे एमएसएमई सक्षम लाँच

पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेची पुनरूज्जीवन प्रक्रिया पाठिंबा देण्यासाठी आणि एमएसएमईजना बळकट करण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (सिडबी) ट्रान्सयुनियन सिबिलच्या सहकार्याने लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमईज) एमएसएमईजसक्षम हे सर्वसमावेशक आर्थिक शिक्षण आणि ज्ञान देणारे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) लाँच केले आहे.

पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेची पुनरूज्जीवन प्रक्रिया पाठिंबा देण्यासाठी आणि एमएसएमईजना बळकट करण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (सिडबी) ट्रान्सयुनियन सिबिलच्या सहकार्याने लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमईज) एमएसएमईजसक्षम हे सर्वसमावेशक आर्थिक शिक्षण आणि ज्ञान देणारे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) लाँच केले आहे. हे अभिनव प्रकारचे, एकाच छताखाली सर्व प्रकारचे ज्ञान देणारे व्यासपीठ एमएसएमईजना सहज आणि विनाअडथळा पद्धतीने कर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन करेल तसेच आपल्या पतविषयक जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी उद्योजकांना पाठिंबा देईल. एमएसएमईजसक्षमच्या लाँचप्रसंगी सिडबीचे अध्यक्ष मोहंमद मुस्तफा म्हणाले, ‘सद्य परिस्थितीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी एमएसएमईज सज्ज होत असताना विनाअडथळा कर्ज उपलब्धी तसेच विश्वासार्ह माहिती मिळवून देण्यातील आमची भूमिका महत्त्वाची आहे याची आम्हाला जाणीव आहे.