अंडी उधार न दिल्याच्या रागाचा झाला कडेलोट आणि पुढे…

साताऱ्यातील यवतेश्वर पावर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले यांचं दुकान आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे हे दोखे शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्या दुकानात गेले होते. त्यांना दुकानदार बबन गोखले यांना अंडी उधार मागितली. मात्र, बबन यांनी अंडी उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. शुभम आणि सचिन याला याचा राग आला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सातारा : अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.या धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं आहे. साताऱ्यातील बोगदा परिसरात ही घटना घडली असून दुकानदारावर दगड आणि आणि धारदार शस्त्रानं सपासप वार करण्यात आले आहेत. बबन हणमंत गोखले (वय-४२) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे. शुभम कदम, सचिन माळवे अशी आरोपींची नावे आहेत.

साताऱ्यातील यवतेश्वर पावर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले यांचं दुकान आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे हे दोखे शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्या दुकानात गेले होते. त्यांना दुकानदार बबन गोखले यांना अंडी उधार मागितली. मात्र, बबन यांनी अंडी उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. शुभम आणि सचिन याला याचा राग आला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बबन यांनी अंडी दिल्याचा नकार दिल्यानं हे दोघेही संतापले. त्यांनी रागाच्या भरात बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी बबन गोखले यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्रानं सपासप वार केले. यामध्ये बबन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण सातारा शहर हादरलं आहे.

याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी फक्त अंडी उधार न देण्याच्या रागातून ही हत्या केली की, यामागे आणखी काही कारण आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.