नायडू हॉस्पिटलचा सावळागोंधळ चव्हाट्यावर

पुणे : पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच कोविड सेंटर असलेल्या नायडू हॉस्पिटलचा सावळा गोंधळ समोर आल्याने ही चिंतेची बाब सध्या ठरत आहे.

पुणे : पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच कोविड सेंटर असलेल्या नायडू हॉस्पिटलचा सावळा गोंधळ समोर आल्याने ही चिंतेची बाब सध्या ठरत आहे. नायडू हॉस्पिटल मध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील सुमारे वीस ते पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  

अशातच मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाला. तेव्हा हॉस्पिटलमधील जनरेटर चालू होणं अपेक्षित होतं. परंतु हे जनरेटर वीज खंडित झाल्यानंतर देखील सुरू झाले नाही. सुदैवानं वीज पुरवठा काही काळातच पूर्वरत झाल्याने व्हेंटिलेटर पुन्हा सुरू झाले त्यामुळे रुग्णांचे प्राण बचावले गेले.