पुण्यात सूक्ष्मबाधित क्षेत्र  जाहीर

पुणे : राज्यासह शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अनेक दिवसांच्या लॉकडाऊन नंतर देखील कोरोनाची ही साखळी तोडण्यास अपयश येत आहे. अशातच पुण्यातील ज्या ठिकाणांवर कोरोनाचा कहर वाढत चालला आहे अशी ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे अशा ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजेच सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

पुणे : राज्यासह शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अनेक दिवसांच्या लॉकडाऊन नंतर देखील कोरोनाची ही साखळी तोडण्यास अपयश येत आहे. अशातच पुण्यातील ज्या ठिकाणांवर कोरोनाचा कहर वाढत चालला आहे अशी ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे अशा ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजेच सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यातील ही क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत.

सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ,  घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, शिवाजी नगर, पांडव नगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर, संगमवाडी टी.पी स्क्रीन फा, (प्लांट क्र. ७,८, २५, ५९, कस्तुरबा वसाहत), मुळा रस्ता, आदर्शनगर, औंध (७८,७९,८०), शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, पोलिस वसाहत-शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, खैरेवाडी, वडगावशेरी (३०), लोहगाव (२४२, इंदिरानगर), खराडी-चंदनगर-विडी कामगार वसाहत, सिंहगड रस्ता,  वडार वस्ती, वारजे रामनगर, कोथरुड-पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पीएमसी कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत, पौड रस्ता, जयभवानी नगर, कोथरुड आदी ठिकाणी सूक्ष्म बाधित झोन घोषित करण्यात आला आहे. 

या सर्व ठिकाणी वेगळी नियमावली लावण्यात येत असून या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.