‘नवीन शैक्षणिक धोरण क्रांतिकारक’ रामदास काकडे यांचे मत

पुणे : देशात लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या बाबींचा अंतर्भाव असून हे धोरण क्रांतिकारक ठरेल,असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले.

पुणे : देशात लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या बाबींचा अंतर्भाव असून हे धोरण क्रांतिकारक ठरेल,असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले.

बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले. या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांचा सरासरी निकाल ८९.६२ टक्के इतका लागला आहे. तर तंत्रशिक्षण विभागाचा निकाल ६७.२४ टक्के लागला आहे. मावळ तालुक्यात बारावी विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी इंद्रायणी महाविद्यालयाचे आहेत.

– विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता येणार

रामदास काकडे पुढे म्हणाले की, भारतामध्ये सद्य परिस्थितीत नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात येत आहे. यामध्ये ५ + ३ +३ + ४ अशा प्रकारचे शैक्षणिक टप्पे असून पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेता येणार आहे. यापूर्वीच्या शाखा संपुष्टात येत असून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय घेऊन त्यांच्या कौशल्यानुसार शिक्षण घेता येणार आहे. या शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या बाबींचा अंतर्भाव आहे. विद्यार्थ्यांनी पुढील काळात उत्तम प्रकारचे ज्ञान आत्मसात करून देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

-कौशल्यानुसार शिक्षण घेता येणार

इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या चारही शाखांचा निकाल पुढील प्रमाणे- विज्ञान शाखा ९६.१८ टक्के, वाणिज्य ८६.३६ टक्के, कला ८०.९५ टक्के, तंत्रशिक्षण ६७.२४ टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के मलघे व उपप्राचार्य प्रा ए आर जाधव यांनी दिली.

सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, खजिनदार चंद्रकांत शेटे, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या निरूपा कानिटकर आदी उपस्थित होते.

प्रा दिगंबर भापकर, प्रा निता अहिरे व प्रा आर आर डोके या गुरूजणांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी रोख स्वरूपात आर्थिक मदत केली. या कार्यक्रम प्रसंगी प्रा के डी जाधव, प्रा शिवाजी जगताप, प्रा उज्वला दिसले, प्रा मेधा कुटे उपस्थित होते. जान्हवी पाटील व गोवंडी समर्थ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उत्तम खाडप यांनी केले. आभार प्रा एस पी भोसले यांनी मानले.