रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये व्हेंटीलेटर हाॅस्पिटल उभारण्याचे आदेश द्यावेत अन्यथा….

कोविडसाठीची औषधे ताबडतोब उपलब्ध करून द्यावी व शिरूर तालुक्यातील कंपन्यांना कामगारांसह कुटुंबीयांची रॅपिड टेस्ट ( rapid test) करण्याचे तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये( industrial area) व्हेंटीलेटर हाॅस्पिटल(ventilator hospital) उभारण्याचे कंपन्यांना आदेश द्यावेत.

शिरूर : कोविडसाठीची औषधे ताबडतोब उपलब्ध करून द्यावी व शिरूर तालुक्यातील कंपन्यांना कामगारांसह कुटुंबीयांची रॅपिड टेस्ट ( rapid test) करण्याचे तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये( industrial area) व्हेंटीलेटर हाॅस्पिटल(ventilator hospital) उभारण्याचे कंपन्यांना आदेश द्यावेत.अन्यथा सोमवार रोजीपासुन कंपन्या बंद करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी तहसिलदार यांना आॅनलाईन निवेदन देऊन दिला आहे.

भाजप उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष व क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिरूर तालुक्यातील कोवीड विषाणुचा फैलाव गंभीर होत चालला आहे तरीही प्रशासन ठोस निर्णय घेत नाही, वारंवार लेखी तक्रार करुनही कंपन्यांतील कामगारांची व कूटुंबियांची कोवीड रॅपिड टेस्ट करण्याचे आदेश दिलेले नाहीत.याचा गंभीर परिणाम स्थानिक गोरगरिबांना बसत आहे.

शासनाने औषधे ही उपलब्ध करून दिलेली नाहीत. कंपन्यामध्ये सर्रासपणे रेड झोन मधुन अधिकारी वर्ग येत असुन अनेक मोठय़ा कंपन्यांमध्ये समुहाने कोवीड पेशंट सापडत आहेत. पण त्याची माहिती लपविली जात असुन त्याचा फटका स्थानिक कामगारांना बसत आहे.
स्थानिक कामगारांना बळजबरीने कामावर येण्याचे बंधन घातले जात असुन पाॅझीटीव्ह आढळून आल्यावर स्वतः खर्च करण्याची वेळ येते.कंपन्या सुरू ठेवण्यास आमची काही हरकत नाही पण जे नियम सर्व सामान्य नागरिकांना आहेत तेच नियम कंपन्यांनी ही पाळणे आवश्यक आहे.
कामगारांना कंपनीच्या आत कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या ही तक्रारी येत आहेत. तरीही प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नाही. कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण राहीलेले नसुन त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कोवीड चा फैलाव होत असल्याने सोमवार दि.३१ पर्यंत जर कंपन्यांना असे आदेश देण्यात आले नाही व कोवीड रॅपिड टेस्ट करण्यात आल्या नाही तर नाईलाजाने शिरुर तालुक्यातील संपूर्ण कंपन्यां बळजबरीने बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

सोमवार पासून याला सुरवात करण्यात येईल. व रांजणगाव एमआयडीसी मधे एकही कंपनी सुरू होऊन दिली जाणार नाही.त्याचबरोबर रांजणगाव एमआयडीसीमध्ये व्हेंटीलेटर हाॅस्पिटल उभारण्याचे कंपन्यांना आदेश द्यावेत.शिरूरच्या सरकारी रुग्णालयात ताबडतोब कोवीड साठीची ससुन रुग्णालयात उपलब्ध असणारी औषधेही कोवीड सेंटरला उपलब्ध करून देण्यात यावीत व तालुक्यातील कोरोना हाॅटस्पाॅट मधील गावांमध्ये ही सर्रासपणे कोवीड रॅपिड टेस्ट करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.