शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकांलाकडे पालकांचे लक्ष

मंचर : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशिरा होवुनही त्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. परंतु राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होऊनही परिक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०२० सालची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली होती. मात्र शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. या परीक्षेतुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात समोर येत असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी  परीक्षेचा अभ्यास करुन परीक्षा देत असतात. या परीक्षेचा लवकर निकाल जाहीर करावा. तसेच राज्यातील केंद्रप्रमुख,मुख्याध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरावीत. मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची ४५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे हि पदे लवकर भरण्यात यावी. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ही पदे भरणे गरजेचे आहे,अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे रामभाऊ सातपुते गुरुजी यांनी केली आहे.