पीएमपीएमएलची बससेवा होणार पूर्ववत

शहरात वाढत्या कोरोनाने सर्वसामान्य जनतेला हैराण केले आहे. नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये देशात कोरोना चा प्रसार सुरू झाला. फेब्रुवारी अखेर पर्यंत शहरात त्याची एंट्री झाली.

पुणे : शहरात वाढत्या कोरोनाने सर्वसामान्य जनतेला हैराण केले आहे. नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये देशात कोरोना चा प्रसार सुरू झाला. फेब्रुवारी अखेर पर्यंत शहरात त्याची एंट्री झाली. कोरोनाला थांबवण्यासाठी देशात लॉक डाऊन देखील करण्यात आले परंतु तरीदेखील कोरोनाची ही साखळी तोडण्यात प्रशासन अक्षम पडले. आता हळू हळू हे लॉक डाऊन शिथिल करत शहरात सेवा पूर्ववत होते आहेत.

यामध्येच आता अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांसाठी बंद करण्यात आलेल्या पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून बस सेवा पूर्ववत होण्याचे संकेत आहे. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून ही सेवा सुरू केली जाऊ शकते.  हा निर्णय झाल्यास, शहरातील अनेक भागातील कामासाठी दळणवळण करण्याऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये बससेवा सुरु करण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. आता, त्यांनी तत्वतः मान्यता दिली असून येत्या २२ तारखेला सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, अजूनही प्रशासनाने अधिकृत तारीख जरी जाहीर केली नसली तरी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर हि सेवा सुरु केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.