पोलिसांनी केले जुगारी टोळीला वर्षभरासाठी हद्दपार

सातारा : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहेत.राज्यात लॉकडाऊनमुळे तीन महिने दारूबंदी होती परंतु आता सरकारने अनलॉक टप्प्याटप्प्याने सुरु  केले आहे. दारू विक्रीला परवानंगी दिली आहे तरी अनेक जण अवैध दारू विक्री करत आहेत तसेच जुगाराचा व्यवसाय चालवित आहेत. साताऱ्यातील  कुडाळ, ता. जावळी येथील तीन जणांच्या टोळीला अवैध दारू विक्री आणि जुगार अड्डा चालविल्याप्रकरणी  एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.दीपक रामचंद्र वारागडे (वय ४५, टोळी प्रमुख), सुनील गोविंद गावडे (वय ३२) प्रवीण रामचंद्र वारागडे (वय ४४, सर्व रा. कुडाळ, ता. जावळी) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.

या तिघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात अवैध दारू विक्री आणि  जुगाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत.वारंवार त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्यामुळे मेढा पोलिसांनी या तीन जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी होऊन या टोळीला वर्षभरासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार  करण्यात आले आहे.