महाराष्ट्रातील सर्वात जास्त रुग्णसंख्येमुळे ‘पुणे’ ठरले नवे ‘हॉटस्पॉट’

प्रत्येक गोष्टीत पुढे असणारे पुणे आणि पुणेकरांनी एक नवीन विक्रम केला आहे. परंतु हा विक्रम पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण भारतात होत असणाऱ्या कोरोनाच्या संसर्गात पुणे एक नंबर वर जाऊन पोहचले आहे.

पुणे : प्रत्येक गोष्टीत पुढे असणारे पुणे आणि पुणेकरांनी एक नवीन विक्रम केला आहे. परंतु हा विक्रम पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण भारतात होत असणाऱ्या कोरोनाच्या संसर्गात पुणे एक नंबर वर जाऊन पोहचले आहे. भारतातील इतर सर्व शहरांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळले असल्याने मुंबईला मागे टाकत कोरोनाचे ‘पुणे’ हे नवीन हॉटस्पॉट बनले आहे .

रविवारी केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने दक्षिण अफ्रिकेलाही मागे टाकले असून या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५,९५,८६५ इतकी आहे. जागतीक आकडेवारीनुसार, दक्षिण अफ्रिकेचा पाचवा क्रमांक लागतो. याबाबत अमेरिका (५५,६६,६३२), ब्राझिल (३३,४०,१९७), भारत (२६,४७,३१६) आणि रशिया (९,२२,८५३) हे देश दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहेत. दरम्यान, मुंबई शहर हे अद्यापही कोरोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणात आघाडीवर आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसात कोरोनामुळे ३०० पेक्षा कमी जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे आतापर्यंत २०,०३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ५,९५,८६५ जण कोरोनाबाधित आहेत.