ड्रेनेजच्या कामात दोषी आढळल्यास राजीनामा देण्यास तयार

वाघोली : (ता. हवेली) वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टे २२ जुलै रोजी राबवण्यात आलेल्या ई-निविदेबाबत विविध वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित झाले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असलेल्या कामांची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा कोरोना महामारीमुळे टेंडर प्रक्रियेला विलंब होत होता.

ग्रामपंचायत सदस्या कविता दळवी; वाघोली ग्रामपंचायत ई-निविदा प्रकरण

वाघोली : (ता. हवेली) वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टे २२ जुलै रोजी राबवण्यात आलेल्या ई-निविदेबाबत विविध वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित झाले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असलेल्या कामांची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा कोरोना महामारीमुळे टेंडर प्रक्रियेला विलंब होत होता. पावसाळा तोंडावर आल्यामुळे ड्रेनेजचे काम सुरु करण्यात आले. वार्ड क्रमांक चार मधील ड्रेनेजच्या कामांमध्ये दोषी आढळल्यास स्वतःहून ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे कविता दळवी यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विकास कामास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या कविता दळवी यांनी केले आहे.

– नागरिकांनी सहकार्य केल्यास मुलभूत प्रश्न मार्गी लावणार

वाघोली (ता. हवेली) येथील १५ जुलै २२ जुलै रोजी राबवण्यात आलेली ई-निविदा मधील काही कामांच्याबाबतीत स्थानिक शेतकरी व नागरिकांनी आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी विविध माध्यमांतून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल घेत वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी मासिक सभेत हवेली पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता येंडे यांना स्थानिक तक्रारदार शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यासाठी व योग्य ती कार्यवाही करण्यासाठी बोलावले होते. यावेळी संबधित शाखा अभियंता यांनी कामांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे होत असलेल्या कामांबाबत स्थानिकांनी केलेल्या तक्रारीला पुष्टी मिळाली होती. परंतु ग्रामपंचायत सदस्या कविता दळवी यांनी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टे २२ जुलै रोजी काढण्यात आलेल्या ई-निविदेला प्रशासकीय मान्यता असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असलेल्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता असताना देखील कोरोना महामारीमुळे ई-टेंडर काढण्यास विलंब होत असल्यामुळे व पावसाळ्यापुर्वी कामे व्हावी या दृष्टीकोनातून काम सुरु करण्यात आले असल्याचे दळवी यांनी सांगितले.

-विकास काम थांबवणे योग्य नाही

पाच हजार लोकांचा मुलभूत प्रश्न असल्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी ड्रेनेजचे काम सुरु केले आहे. केवळ टेंडर प्रक्रियेला उशीर झाला म्हणून विकास काम थांबवणे योग्य नाही. ड्रेनेज लाईनचे काम झाल्यास पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे. वाघमारे वस्ती, वाघोली गावठाण व संत तुकाराम नगर येथील नागरिकांनी सुद्धा काम थांबवू नये अशी मागणी देखील ग्रामपंचायतीकडे केली असल्याचे दळवी यांनी सांगितले.

गृहप्रकल्पधारकांकडून ड्रेनेजच्या कामासाठी वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य कोणी आर्थिक मागणी करत असल्यास त्यासंबंधी ग्रामपंचायतीकडे तक्रार करावी किंवा संबधित पोलीस स्टेशनला संबधितांनी गुन्हा दाखल करण्यात यावा असे कविता दळवी यांनी सांगितले. संबधित कामाबाबत दोषी आढळल्यास वार्ड चार मधील तीनही सदस्य स्वतःहून राजीनामे देण्यास तयार असल्याचे ग्रा. पं. सदस्या कविता दळवी यांनी सांगितले.    

 

– सद्यस्थितीत चालू असलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता आहे. परंतु कोरोना महामारीमुळे टेंडर प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे आणि पावसाळा तोंडावर आल्यामुळे ड्रेनेजचे काम सुरु करण्यात आले आहे. वार्ड चार मधील ड्रेनेजच्या कामात दोषी असल्यास स्वतःहून ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देईल. एवढेच नाही तर माझेवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

    कविता सुधीर दळवी (ग्रा.पं. सदस्या, वाघोली)