सांगली महापालिका क्षेत्र शतकाच्या उंबरठ्यावर

सांगली : सांगली महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी दुपारपर्यंत ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. सांगलीतील खणभाग येथील एक ४२ वर्षीय पुरूष, वानलेसवाडी येथील २७ वर्षीय महिला यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलमधील सहायक महिला डॉक्टर यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या चिंतामणराव कॉलेजमागे कृष्णाली वसाहत येथील आहेत.

वारणाली रोडवरील हॉटेल आमंत्रण परिसरातील ३६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. दत्तनगर सांगली येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली. मिरजेतील रेवनी गल्लीतील २५ वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी दिली.

दरम्यान सांगली महानगरपालिका क्षेत्रात आजअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ९६ झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्र कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या एकूण संख्येच्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.

घाटकोपर (मुंबई) येथून दि. ३ जुलै रोजी कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एक दांपत्य आले आहे. त्यातील ६२ वर्षीय पतीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांची ५२ वर्षीय पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. नागठाणे (ता. पलूस) येथील ३ व्यक्तींचे चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सोनसळ, कडेगाव, नेवरी (ता. कडेगाव) येथील ४४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. केदारवाडी, बावची, किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील १६ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. शिराळा तालुक्यातील एक व्यक्ती निगेटिव्ह आली आहे. शनिवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील आज अखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ६२४ झाली आहे.