शशिकांत पाटील यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मराठा समाजाला आरक्षण (Reservation for the Maratha community) मिळावे ही पहिली मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती.

कर्जत : मराठा समाजाला आरक्षण (Reservation for the Maratha community) मिळावे ही पहिली मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. प्रलंबित मागणी सत्यात उतरत असल्याने रिपब्लिकन पक्षात(republican party) प्रवेश करत असल्याचे नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी म्हटले आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असणारे, कर्जत तालुक्यात विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष प्रा पाटील यांचे सामाजिक योगदान तसेच , छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर या महापुरुषांचे विचार घेऊन चळवळीत काम करण्याची तळमळ पाहून अ नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात कर्जत तालुक्याचे तालुकाध्यक्ष संजय भैलूमे, शहराध्यक्ष सागर कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश देण्यात आला.
मुंबई येथील ना आठवले यांचे संविधान बंगल्यावर सोशल डिस्टन्स ठेऊन केंद्रीय मंत्री आठवले यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रवेश देण्यात आला. कर्जत तालुक्याचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांचे सूचनेवरून तर प्रदेश उपाध्यक्ष तथा अ नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली . अ नगर, धुळे,नाशिक, जळगाव जिल्ह्याची समन्वयक म्हणून जबाबदारी देखील देण्यात आली. मराठा समाज हा ग्रामीण भागात अजूनही आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करून सामाजिक ऐक्य, बंधुभाव टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रवेशाप्रसंगी पाटील यांनी भावना व्यक्त केल्या . तर सर्व जाती धर्माच्या माणसांना सोबत घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत , पक्ष शिस्त पाळत काम करण्याच्या सूचना व शुभेच्छा मंत्री ना आठवले यांनी दिल्या . पाटील यांच्या निवडीचे रिपाइंचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी ऑनलाइन बैठकीत जिल्ह्याच्या वतीने विशेष स्वागत केले . तर उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष राजाभाऊ कापसे, अ नगर जिल्हा विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,बहूजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय भिसे,खादीग्रामोद्योगचे चेअरमन महादेव सुरवसे, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम आदींनी शुभेच्छा दिल्या .