ऑनलाइन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे : जागतिक वन्यजीव रक्षक दिनानिमित्त ‘लोक शिक्षणातून निसर्ग संवर्धन’ फ्रेंड्स ऑफ नेचर असोशियनतर्फे दोन अॉनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना सर्पां विषयी माहिती व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी ( शिरगाव ) शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घर बसल्या ऑनलाइन सर्प जनजागृती आणि माहितीपर कार्यक्रम घेण्यात आला.

फ्रेंड्स ऑफ नेचर असोशियनतर्फे आयोजन
तळेगाव दाभाडे : जागतिक वन्यजीव रक्षक दिनानिमित्त ‘लोक शिक्षणातून निसर्ग संवर्धन’ फ्रेंड्स ऑफ नेचर असोशियनतर्फे दोन अॉनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना सर्पां विषयी माहिती  व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी ( शिरगाव ) शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घर बसल्या ऑनलाइन सर्प जनजागृती आणि माहितीपर कार्यक्रम घेण्यात आला. सदर उपक्रम २ दिवस घेण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुपर्णा गायकवाड यांनी स्वतः हा उपक्रम घेतला. यात त्यांनी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक इयत्तेतील मुलांशी संवाद साधला आणि त्यांचे शंका निरसन सुद्धा केले. दुसर्‍या कार्यक्रमात, कॅमेऱ्याच्या सहाय्याने वन्यजीव व निसर्ग छायाचित्रण कसे करावे याविषयी ऑनलाइन माहितीपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मागील ३ दिवस चाललेल्या या उपक्रमात ४५ पेक्षा जास्त लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर उपक्रम हा ऑनलाईन असल्यामुळे मुंबई, पुणे, अहमदनगर, अकोला अशा वेगवेगळ्या शहरातून लोक सहभागी झाले होते.  प्राणी व पक्षी यांना कोणताही त्रास न देता उत्तम पद्धतीने छायाचित्रण कसे करावे, छायाचित्रणाचा छंद जोपासताना फक्त निसर्गाची विविध रूपेच न टिपता त्याचे संवर्धन सुद्धा झाले पाहिजे, हा मूळ उद्देश यामागे होता. सदर उपक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव जय गोरे व सभासद केदार गोरे यांनी केले.