पुणे जिल्ह्यांतर्गत पुन्हा एकदा एसटी सेवा सुरू

लॉकडाऊन नंतर राज्य परिवहन महामंडळाकडून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर एस टी सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटीच्या सेवेला सुरुवात झाली असून प्रत्यक्षात मात्र प्रवाशांचा प्रतिसाद हवा तितका मिळत नसल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुणे : लॉकडाऊन नंतर राज्य परिवहन महामंडळाकडून पुन्हा एकदा  पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर एस टी सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटीच्या सेवेला सुरुवात झाली असून प्रत्यक्षात मात्र प्रवाशांचा प्रतिसाद हवा तितका मिळत नसल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुणे जिल्हांतर्गत सुरू झालेल्या एसटीच्या ५५ बसेस सध्या रस्त्यांवर धावत आहेत. सरकारनं फिजिकल डिस्टंसिंगच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे प्रत्येक बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

यांपैकी १० ते १२ एसटी गाड्या या वाकडेवाडी आणि स्वारगेट बस डेपोमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोडण्यात येत आहेत. तर इतर बससेवा या तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणाऱ्या असणार आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

सध्या या एसटी गाड्या पुण्याहून बारामती, भोर, शिरुर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, दौंड, पाटस, नीरा, जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, वेल्हा, पौड, मुळशी तसेच बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर आणि जुन्न-देवळे या मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत.