आंबेगावच्या तहसिलदारांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

आंबेगाव तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी यांना घोडेगांव (ता.आंबेगाव) येथील कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाची पुर्ण अंमलबजावणी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मंचर  : आंबेगाव तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी यांना घोडेगांव (ता.आंबेगाव) येथील कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाची पुर्ण अंमलबजावणी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. (दि.७) ऑगस्ट रोजी केंद्र व राज्य शासनाच्या ओ.बी. सी. आरक्षणाबाबत पूर्ण अमलबजावणी न करणे तसेच देशामध्ये मंडल आयोगानुसार मिळणारे २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची केंद्र व राज्य सरकारकडून पायमल्ली करण्याच्या निर्णयाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त  करुन  निवेदन देण्यात आले. यावेळी शशिकांत भालेराव, नरेश कसबे, सुनिल अंकुश, अशोक बाळसराफ, तुषार लवांडे, उत्तम वाघमारे, पंकज सरोदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे कि देशामध्ये ओबीसी आरक्षणाला मंडल आयोग कमिशन नुसार दिलेल्या २७ टक्के आरक्षणाची उघडपणे पायमल्ली सुरु आहे. सन १९७८ म्हणजे डिसेंबरच्या महिन्यात तत्कालीन जनता दलाच्या मोरारजी देसाई सरकारने भारतातील सामाजिक व आर्थिक स्तरांवर मागास राहिलेल्या जाती व जमातीचे अध्ययन आणि त्यांचे वर्गीकृत विश्लेषण करण्यासाठी एक सहा सदस्यीय आयोग नेमला. आयोगाने ३७४३ जातींना मागास गटात प्रविष्ट केले. अशा जातींची संख्या एकूण लोकसंख्येला ५२ टक्के होती. ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करण्यात आला.