विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या पण……

यंदाच्या वर्षातल्या सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट पसरले आहे. नोव्हेंबर मध्ये देशात एंट्री केलेल्या कोरोनाने फेब्रुवारी- मार्च पर्यंत शहरात एंट्री केली होती.

पुणे: यंदाच्या वर्षातल्या सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट पसरले आहे. नोव्हेंबर मध्ये देशात एंट्री केलेल्या कोरोनाने फेब्रुवारी- मार्च पर्यंत शहरात एंट्री केली होती. आणि आता दिवसोंदिवस या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत जाताना दिसत आहे. यातच विद्यार्थ्यांसाठी एखाद्या उत्सवासारखा वाटणारा दिवस म्हणजे गुणपत्रिका हातात मिळण्याचा दिवस परंतु कोरोनामुळे त्यांच्या या आनंदावर विरजण पडले आहे. 

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका हातात मिळण्याची उत्सुकता होती पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा दहावीच्या गुणपत्रिका वाटपाचा सोहळा शाळेत होऊ शकला नाही. परिणामी विद्यार्थीच्या या आनंदावर विरजण पडले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने  सांगण्यात आले. शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य सांगण्यात आले होते. त्याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.