Online learning in Corona Period

  • टीम वसई फर्स्ट आणि डिजिटल वसई संस्थेचे विद्यार्थ्यांना तांत्रिक सहकार्य

वसई (Vasai ). ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या शाळा आपल्या घरी या उपक्रमात हजारो विद्यार्थी रमले असून या पद्धतीचा विनामूल्य लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.

करोना काळात आॅनलाइन शिक्षण पद्धत सुरू असली तरी अद्याप २७% मुलांकडे इंटरनेट सुविधा किंवा साधा मोबाइलही नाही. हीच बाब लक्षात घेऊन पालघर जिल्हातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आ. क्षितीज ठाकूर यांनी ‘शाळा आपुल्या दारी’हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.या या नव्या शिक्षणपद्धतीत इयत्ता पहिली ते दहावीतील हजारो विद्यार्थी रमले आहेत.शाळा आपुल्या घरी’ या उपक्रमाद्वारे वसई तालुक्यातील शिक्षकांद्वारे इयत्ता पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी भाषेत रेकाॅर्ड करण्यात येत आहे.हा अभ्यासक्रम स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून लाखों मुलांच्या घराघरात पोहोचविला जात आहे. टीम वसई फर्स्ट आणि डिजिटल वसई या संस्थेचे उत्तम तांत्रिक सहकार्य लाभल्यामुळे तो सर्व विद्यार्थ्यांच्या सहज पचनी पडत आहे.सिग्नेट मराठी या केबलच्या ५३ क्रमांक चॅनेलवर मराठी व सेमी इंग्रजीत सकाळी ९ ते १२.३० वाजता आणि सायंकाळी ४ ते ६.३० वाजता या अभ्यासक्रमाचे पुन:प्रक्षेपण केले जात आहे.

सिग्नेट टाॅलिवूड (चॅनेल ५६) वर इंग्रजी माध्यमातून सकाळी ९ ते १० आणि पुन:प्रक्षेपण: सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी शिक्षकांचे समायोजन, अभ्यास क्रम, वेळापत्रक नेमून देणे, यासाठी प्राचार्य माणिक दोतोंडे आणि प्राचार्य कल्पना राऊत नेतृत्व करत आहेत. या उपक्रमानिमित्ताने सर्व शिक्षक नवीन तंत्रज्ञान शिकत असल्याने ही समाधानाची बाब आहे. 

एसएससी बोर्डवर आधारित हा रेकाॅर्ड केलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही स्थानिक पातळीवर राबवायचा असल्यास, बहुजन विकास आघाडीकडून विनामूल्य संपूर्ण सहकार्य केले जाईल. --- आमदार हितेंद्र ठाकूर

एसएससी बोर्डवर आधारित हा रेकाॅर्ड केलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही स्थानिक पातळीवर राबवायचा असल्यास, बहुजन विकास आघाडीकडून विनामूल्य संपूर्ण सहकार्य केले जाईल. --- आमदार हितेंद्र ठाकूर