विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्य आत्मसात करावे

‘स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाला आज सर्व क्षेत्रांत स्वयंपूर्ण बनविणे. आणि ह्यासाठी प्रत्येक जण काहीतरी योगदान देऊ शकतो.

पुणे :  ‘स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाला आज सर्व क्षेत्रांत स्वयंपूर्ण बनविणे. आणि ह्यासाठी प्रत्येक जण काहीतरी योगदान देऊ शकतो. स्वतः शिक्षित होऊन तसेच आवश्यक कौशल्यांचा विकास करून आपण आपल्याला उद्याच्या कार्यबलासाठी तयार करू शकतो. अशा रीतीने आपण भारताचा विकास करून ह्या देशाला जगाचा नेता बनवू शकतो,असे प्रतिपादन विबग्योर स्कूल्स समूहाचे मुख्य विपणन अधिकारी पेशवा आचार्य यांनी व्यक्त केले.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विबग्योर स्कूल्सच्या समूहाने आज आपल्या पुणे कॅम्पस येथील विद्यार्थ्यांकरिता मायक्रोसॉफ्ट टीम्स ह्या प्लॅटफॉर्मवर आभासी समारंभ आयोजित केला. त्या वेळी ते बोलत होते.

अनेक विद्यार्थी, पालक, तसेच प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना अगदी घर बसल्या या समारंभात सहभागी होता आले. शाळेने ध्वजारोहणाचे रेकॉर्डिंग ह्या आभासी सत्रात प्रक्षेपित केले.  ह्यात मुख्याध्यापकांचे भाषणही समाविष्ट करण्यात आले. सत्र सुरू असताना विद्यार्थ्यांनीही उपस्थितांना उद्देशून भाषण दिले तसेच इतरांनी राष्ट्रगीतही गायले.