तळेगाव ढमढेरेच्या वाळू गाड्या चोरी प्रकरणाला वेगळे वळण

शिक्रापूर : शिरूर तालुक्यात सध्या महसूल विभाग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असून महसूल विभागाचे एकामागे एक कारनामे समोर येताना दिसत आहे, तर आता पुन्हा महसूल विभागाच्या ताब्यातील अन्नधान्य गोडावून मधून तीन वाळूच्या गाड्या चोरीला गेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून नायब तहसीलदारनी साडेचार लाख घेऊन गाड्या सोडल्याचा आरोप गाड्या मालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला असल्याने खळबळ उडाली आहे.

 नायब तहसीलदारनी साडेचार लाख घेऊन गाड्या सोडण्याचा मालकांचा आरोप

शिक्रापूर : शिरूर तालुक्यात सध्या महसूल विभाग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असून महसूल विभागाचे एकामागे एक कारनामे समोर येताना दिसत आहे, तर आता पुन्हा महसूल विभागाच्या ताब्यातील अन्नधान्य गोडावून मधून तीन वाळूच्या गाड्या चोरीला गेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून नायब तहसीलदारनी साडेचार लाख घेऊन गाड्या सोडल्याचा आरोप गाड्या मालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला असल्याने खळबळ उडाली आहे.

       तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील अन्नधान्य गोदामात महसूल विभागाने पकडलेल्या वाळूच्या ट्रक लावण्यात आल्या होत्या, त्यावेळी शिरूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांनी प्रत्येक गाडी सोडण्यासाठी दीड लाख दंड असे सुमारे साडेचार लाख रुपये दंड घेऊन कोणतीही पावती वाहन मालकांना न देता तळेगाव ढमढेरे येथील अन्नधान्य गोदाम पालक डाळींबकर यांना फोन करून गाड्या सोडण्यास सांगितले, त्यांनतर सदर गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या मात्र त्या नंतर कोणतीही पावती न देता देखील वाहन मालकांवर तळेगाव ढमढेरे अन्न धान्य गोदामातून वाहने चोरून नेल्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, या  धक्कादायक प्रकाराचा खुलासा गाड्या  मालकांकडून करण्यात आला असून याबाबत त्यांनी लेखी प्रतिज्ञापञ उपविभागीय अधिकारी शिरुर आणि तहसीलदार शिरुर यांना देण्यात आले आहे. तर या गाड्यांचा भरलेल्या साडेचार लाख रुपये दंडाच्या पावत्या बाबत वेळोवेळी मागणी करून देखील आज देऊ उद्या देऊ म्हणूत आज पर्यत  कुठल्याही प्रकाची पावती दिली नसून उलट आमच्या विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गाड्या चोरून नेल्याबाबत  गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे संबंधित नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांची  योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी गाड्यामालक करत आहेत. या प्रकरणामुले शिरूरचा महसूल विभाग पुन्हा एकदा वेगवेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. याबाबत शिरूरचे नायब तहशिलदार श्रीशैल वट्टे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला असता संपर्क होउ शकला नाही. तर याबाबत बोलताना तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले की प्रतिज्ञापत्र मला व्हाट्सअप वर मिळाले असून त्या अनुषंगाने मी संबंधित नायब तहसीलदार आणि गोडाऊन पालक यांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे. तर याबाबत गाड्या मालकांशी चर्चा केली असता आमच्यावर अचानक पणे गुन्हे दाखल झाल्याने आम्हाला जामीन घेऊन बाहेर पडणास वेळ लागला असल्यामुळे आम्हाला तक्रारी साठी वेळ लागला तसेच उपविभागीय अधिकारी यांनी याबाबतीत लेखी मागितल्याने आम्ही नोटरी करून प्रतिज्ञापञ सादर केले असल्याचे सांगितले आहे.

सदर प्रकरणाची चौकशी सुरु आहे – प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख

शिरूर महसूल विभागातील नायब तहसीलदार यांच्या कारनाम्याबाबत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी बोलताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर याबाबत माहिती दिली जाईल असे सांगितले.