पुणे -मुंबई महामार्गावर भीषण अपघात

पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या कामशेत येथे आज सकाळी कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

पुणे : पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या कामशेत येथे आज सकाळी कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. विनोद नंदकुमार चौधरी (वय ३८, रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात किरकोळ जखमी झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास वाहनचालक कंटेनर (एमएच ४३, वाय ५७२१) घेऊन चाकणवरून मुंबईकडे चालला होता. कामशेत हद्दीत मुंबई-पुणे लेनवर अचानक वळण आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यावेळी कामशेत पोलिस समीर शेख, संदीप शिंदे आणि होमगार्ड आदी घटनास्थळी दाखल झाले. कामशेत पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे १५ मिनिटांत कंटेनर दोन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार राम कानगुडे यांनी दिली