भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद अंदोलन

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर "दार उघड उध्दवा दार उघड" च्या घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद अंदोलन करण्यात आले.

लोणी काळभोर : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर “दार उघड उध्दवा दार उघड” च्या घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद अंदोलन करण्यात आले. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील धार्मिक स्थळे गेली पाच महिन्यापासून बंद आहेत.त्यामुळे यावर उदरनिर्वाह असलेल्या अनेक कुटूंबीयाची उपासमार होत आहे. पुनःश्च हरिॐ करण्यात आल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होत असताना केवळ देवालये बंद ठेऊन काय साध्य होणार आहे.

घंटानाद आंदोलनाच्यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यात जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर, दादा सातव, गणेश चौधरी, विलास कुंजीर,विशाल गुजर,नितीन टिळेकर,दिनेश झांबरे ,अनिल सातव,संकेत आगलावे,सुनिल शर्मा,शुभम तुपे, आदी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून खाजगी वैद्यकीय सेवेवर सरकारचे नियंत्रण उरले नाही शासकीय आरोग्य सेवेतील कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत परंतु खाजगी यंत्रणा पैसे कमावण्याची कोणतीच कसर सोडत नाहीत असी खरमरीत टीका करण्यात आली.