प्रेयसीला मारून प्रियकराचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

रागाच्या भरात आपल्या प्रेयसीला मारून टाकून प्रियकराने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची घटना रांजणगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे.

पुणे : रागाच्या भरात आपल्या प्रेयसीला मारून टाकून प्रियकराने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची घटना रांजणगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे. आरोपी हा त्याच्या प्रेयसीसोबत कारेगाव येथील फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चे मानसिक संतुलन ठीक नव्हते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळेत एक तरुण घाबरलेल्या अवस्थेत पोलिस ठाण्यात आला. त्याच्या या अवस्थेमागचे कारण विचारल्यास त्याने पोलिसांना पेन आणि कागदाची मागणी केली. 

दिलेल्या कागदावर त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. आपण टेंशन डिप्रेशनचा पेशंट असून या अवस्थेत माझ्याकडून एक गुन्हा झाला आहे. मी स्वतःच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून जीव घेतला असून कृपया मला फाशी द्या’ असं लिहून ते पत्र त्यानं चक्क पोलिसांना दिलं. एवढंच नव्हे तर रुमला बाहेरून लाॅक लावून आल्याचं सांगत रूमची चावीदेखील पोलिसांना दिली. आरोपी ने स्वतःचे नाव किरण फुंदे ( रा. राजगड प्लाझा) असं सांगितलं.

घडलेल्या घटनेची पाहणी केली असता पोलिसांना रूममध्ये २४ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला. आरोपीकडे अधिकचा तपास केला असता त्यानं सांगितलं की, चार महिन्यांपासून आम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असून प्रेयसी स्वखुशीच्या संबंधातून गरोदर राहिली होती.

मुल खाली करण्यासाठी बराच खर्च होता. मात्र पैसे नसल्यानं आमच्यात वाद होत होता. घटनेच्या दुपारी संमतीने संबंध ठेवत असताना प्रेयसीनं अपमान केल्यानं राग अनावर झाला. शेवटी गळा आवळून तीचा खून केल्याची कबूली आता आरोपीनं दिली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.