पिंपरीत कोरोना रुग्णांचा आकडा ३० हजार पार

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आज ७९२ नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत शहरात ३०६१९जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

७९२ नवीन रुग्णांची भर; १४ जणांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आज ७९२ नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत शहरात ३०६१९जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५१० शहरातील नागरिक होते, तर ११७ शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरात ७९२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील ७८३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील ९ जणांना कोरोनाची लागण झाली. आज दिवसभरात १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या ३०६१९ इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात ५७५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील ४३७ रुग्णांचाही समावेश आहे.

पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळवारी दिवसभरात शहरातील १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये बहुतेक रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक होते, परंतु कोरोनामुळे २४, ३४ आणि ४७ वर्षांच्या पुरुषांचा आणि एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शहरातील निगडी, भोसरी, दिघी, पिंपरी, दापोडी, मोरवाडी, वाकड, चिंचवड, पिंपळे निलख, पुनावळे येथील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहरातील मात्र पुणे येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या निगडी व भोसरी येथील ३ महिला रुग्णांचा मृत्यू झाला.