आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ९४२

आंबेगाव तालुक्यात (ambegaon taluka) नवीन ४३ कोरोनाबाधित रुग्ण( corona patients) आढळले असुन एकुण रुग्णसंख्या ९४२ झाली आहे.मंचर येथे सर्वाधिक १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत,अशी माहिती गटविकास अधिकारी जािंलंदर पठारे यांनी शुक्रवारी दिली.

मंचर शहरात सर्वाधित १७ कोरोनाबाधित रुग्ण
मंचर : आंबेगाव तालुक्यात (ambegaon taluka) नवीन ४३ कोरोनाबाधित रुग्ण( corona patients) आढळले असुन एकुण रुग्णसंख्या ९४२ झाली आहे.मंचर येथे सर्वाधिक १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत,अशी माहिती गटविकास अधिकारी जािंलंदर पठारे यांनी शुक्रवारी दिली.

मंचर येथे १७,निरगुडसर येथे ४,नारोडी येथे ३, लोणी, घोडेगांव,चांडोली बुद्रुक, कळंब,िपंळगांव,नांदुर येथे प्रत्येकी दोन, अवसरी खुर्द,अवसरी बुद्रुक,वडगांव काशिबेग,शेवाळवाडी,खडकी, शिनोली,निघोटवाडी येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या ९४२ झाली असुन २३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ४८७ रुग्ण बरे झाले असुन ४३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन (home quarantine) करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.