पुण्यात आजपासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे : २६ जुलै पासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात आजपासून या प्रवेश अर्जातील एक भाग भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांत अकरावी प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

पुणे : २६ जुलै पासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात आजपासून  या प्रवेश अर्जातील एक भाग भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांत अकरावी प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. यावेळी गुणपत्रिकेद्वारे फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे यावेळी इतर कागदपत्रांची सक्ती नसणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरुन अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे.

शुल्क भरून फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक आहेत. तसेच अर्जातील माहिती शाळा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करुन घेणे. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग एक ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हेरिफाईड करून घ्यावा. यावेळी विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकेद्वारे ११ वीचा प्रवेश अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी इतर कागदपत्रांची सक्ती नाही. पण ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर ते अपलोड करु शकतात.

 प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणांमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची वेळ दिली जाणार आहे.  त्याचप्रमाणे क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे.