ज्येष्ठ व्यक्तीस बाजार समितीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंचर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी दुचाकीवरुन तरकारी घेवुन येवु नये.तसेच ६० वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीस बाजार समितीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.या नियमांची अंमलबजावणी बुधवार दि.२ पासुन सुरु केली जाणार आहे.अशी माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

सभापती देवदत्त निकम यांची माहिती

मंचर : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंचर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी दुचाकीवरुन तरकारी घेवुन येवु नये.तसेच ६० वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीस बाजार समितीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.या नियमांची अंमलबजावणी बुधवार दि.२ पासुन सुरु केली जाणार आहे.अशी माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

मंचर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळु लागल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,प्रांतअधिकारी सारंग कोडीलकर,पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे,सहाय्यक निबंधक पी.एस.रोकडे,सचिव सचिन बोऱ्हाडे यांच्यासह आडते व्यापारी,शेतकरी यांची सोशल डिस्टन्स ठेवुन तरकारी बाजाराच्या ठिकाणी बैठक झाली.अनेक शेतकरी दुचाकीवर तरकारी माल घेवुन येतात.त्यामुळे गर्दी होते.तसेच सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. बाजार समितीच्या आवारात दुचाकीवरुन तरकारी घेवुन आलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.असे सांगुन सभापती देवदत्त निकम म्हणाले शेतकèयांनी गावातील पिकअपमध्ये तरकारीचे डाग द्यावे.तसेच पिकअप गाडीमध्ये ड्रायव्हर,क्लीनर अथवा एक शेतकरी अशा दोघांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जाणार आहे.

६० वर्षीय पुढील ज्येष्ठ व्यक्तीस बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही.थुंकणे,मास्क न वापरणे,सोशल डिस्टन्सचा वापर न करणाèया व्यक्तींवर मंचर पोलिस ठाण्याचे जवान आणि मंचर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ५०० रुपयांचा दंड ठोठावुन वसुल करुन त्यास पावती दिली जाणार आहे.असे मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगुन ते म्हणाले बाजार समितीच्या बाहेर किंवा आतमध्ये वाहतुकीस अडथळा होणाऱ्या वाहनांना पोलिस जॅमर लावुन गाडीवर कारवाई करणार आहे.मंचर विभागाचे प्रांतअधिकारी सारंग कोडीलकर म्हणाले मंचर बाजार समितीच्या आवारात सुमारे ७५ ते १०० गावातील शेतकरी तरकारी घेवुन येतात.त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे.बाजार समितीतील व्यापारी,आडते,हमाल यांनी विशेष काळजी घेवुन सोशल डिस्टन्स,सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा.असे आवाहन करण्यात आले.