‘हे’ आहेत पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

हाफकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने सोमवारी ही नियुक्ती केली.

पुणे : हाफकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने सोमवारी ही नियुक्ती केली. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात नुकतीच नियुक्ती झाली आहे.  आपल्या पदाचा कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सोपवून नवलकिशोर राम दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. पुणे जिल्हाधिकारी पदी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. 

यात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे पाटील, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नावे होती परंतु या सगळ्यांमध्ये डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून त्यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी काढण्यात आले.प्रामुख्याने डॉ. देशमुख यांचेच नाव आघाडीवर होती. अखेर शासनाने पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. या आधी देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. तसेच  सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.