शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बारा जण हद्दपार

कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीच्या गणेशोत्सव व मोहरम कार्यक्रम शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस स्टेशन( police station) हद्दीतील बारा जणांना हद्दपार (Deportation) करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

गणेशोत्सव व मोहरमच्या पर्श्वभूमीवर निर्णय

शिक्रापूर : कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीच्या गणेशोत्सव व मोहरम कार्यक्रम शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस स्टेशन( police station) हद्दीतील बारा जणांना हद्दपार (Deportation) करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी लॉकडाऊन काळामध्ये पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींची यादी बनवून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवली होती. त्यांनतर दौंड विभागचे अतिरिक्त उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी अमोल नारायण हंबीर, सुरेश लक्ष्मण गायकवाड, योगेश बबुशा दरेकर, गणेश लक्ष्मण बालगुडे (चौघे रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) भीमराव बाबुराव ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) अजय मोरसिंग बिरावत, एकानंद मोरसिंग बिरावत, रामू बकाराम लांजेवाल (तिघे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) अनिल अर्जुन गायकवाड (रा. मलठण ता. शिरूर जि. पुणे) विश्वास सुखदेव भोरडे (रा. पिंपरी सांडस ता. हवेली जि. पुणे) अविनाश रामकृष्ण डफळ (रा. धामारी ता. शिरूर जि पुणे) तसेच शिवदास दोसासिंग नानावत (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) या बारा जणांना गणेशोत्सव व मोहरम काळामध्ये शिरूर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस नाईक विलास आंबेकर यांनी दिली आहे.