बेघरवस्तीतील ग्रामस्थांचे रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरु

आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव-बेघरवस्ती क्रमांक २ येथील रहिवाश्यांना दैनंदिन वापरासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दीड वर्षापुर्वी रस्ता देण्याचे तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. र

रस्ता मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा कोरडे यांचा निर्धार; आश्वासनाची पुर्तता व्हावी

मंचर: आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव-बेघरवस्ती क्रमांक २ येथील रहिवाश्यांना दैनंदिन वापरासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दीड वर्षापुर्वी रस्ता देण्याचे तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. रस्ता मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार उपोषणकर्ते स्वप्नील जनार्दन कोरडे यांनी व्यक्त केला.

-बेघरवस्तीसाठी रस्ता देण्याची कार्यवाही व्हावी

घोडेगांव-बेघरवस्ती क्रमांक दोन येथील रहिवाशी स्वप्नील जनार्दन कोरडे आणि इतर रहिवाशी दीड वर्षापुर्वी आमरण उपोषणास बसले होते. तीन दिवस उपोषणानंतर बेघर रहिवाश्यांना सहा महिन्यात रस्ता उपलब्ध करुन देवु. असे लेखी पत्र पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु वीस महिने पुर्ण होवुनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. येथील वस्तीतील नागरिक मोलमजुरी करुन उरपनिर्वाह करतात. परंतु कोरोनाच्या महामारीत त्यांचे जगणे अवघड झाले असुन वस्तीतील रहिवाश्याच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा आणि रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार(दि.७) रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवाराबाहेर स्वप्नील जनार्दन कोरडे, राहुल जाधव, सोमनाथ कोरडे उपोषणास बसले आहेत.

-रस्ता देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाणार

उपोषणाबाबत माहिती देताना स्वप्नील कोरडे म्हणाले की, घोडेगांव येथील बेघरवस्तीच्या रस्त्यासाठी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने मासिक सभा दि.२३/४/२०१८ आणि २५/६/२०१८ अन्वये ठराव करुन रस्त्याची मोजणी करण्यासाठी २६/ ६/ २०१८ रोजी चलनाने मोजणीची फी रक्कम भुमी अभिलेख कार्यालय घोडेगांव यांच्याकडे भरली होती. त्यानुसार दि.५/९/२०१८ रोजी रस्त्याची मोजणी झालेली आहे. बेघरवस्तीसाठी रस्ता देण्याची कार्यवाही करण्यासाठी उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाकडुन हद्दनिश्चितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत घोडेगांव यांच्या सहकार्याने संबधित अतिक्रमण धारकांच्या मदतीने सहा महिन्यामध्ये बेघरवस्तीसाठी रस्ता देण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे आश्वासन पंचायत समितीच्या वतीने देण्यात आले होते. परंतु दीड वर्ष होवुनही अद्याप रस्ता उपलब्ध करुन देण्यात आला नाही. ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने बेघर वस्ती क्रमांक दोन येथील नागरिक पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे. याबाबत गटविकास अधिकारी जािंलदर पठारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रस्ता देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.