पुणे शहरातील धरणात मुबलक पाणीसाठा

गेल्या काही दिवसांपासून शहरात समाधानकारक पाऊस झाला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने यापूर्वी पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार याची भीती होती पण आता जोरदार पाऊस झाल्याने पुणेकरांची चिंता मिटली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात समाधानकारक पाऊस झाला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने यापूर्वी पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार याची भीती होती पण आता जोरदार पाऊस झाल्याने पुणेकरांची चिंता मिटली आहे. धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल ८२.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

यामध्ये खडकवासला १.९७ टीएमसी (१००%), पानशेत ९.८२ टीएमसी (९२.१९%), वरसगाव ९.९६ टीएमसी (७७.७८%), टेमघर २.३४ टीएमसी (६२.७५%) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांत तब्बल २३.९७ टीएमसी म्हणजेच ८२.२३% पाणीसाठा आहे.

खडकवासला धरणातून काल सायंकाळी साडे सातपासून १६ हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आलेला विसर्ग आता ९ हजार ३५० क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणावर दिवभरात विसर्ग वेगात बदल होत राहतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ऑगस्ट महिना अखेर पर्यंत जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.