कुरकुंभ येथे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन फुटीचे सत्र सुरूच

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला १३ केव्ही दबावाने पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पाटस येथील दत्त मंदिर येथे शनिवार (ता.८) रोजी दुपारी दोनच्या सुमारास फुटली आहे. सतत पाईप लाईन फुटत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

सतत पाईप लाईन फुटत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता

दौंड :  कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला १३ केव्ही दबावाने पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पाटस येथील दत्त मंदिर येथे शनिवार (ता.८) रोजी दुपारी दोनच्या सुमारास फुटली आहे. सतत पाईप लाईन फुटत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला वरवंड येथील तलाव येथून मोठ्या लोखंडी पाईप व्दारे पाणी पुरवठा केला जातो, संबंधित पाईपचे काम १९९३ साली करण्यात आले होते. यावेळी पाईप लाईनचे वयोमान २५ वर्षाचे झाले असल्याने व अनेक ठिकाणी जोड दिल्याने या पाईप लाईनला पहिल्या सारखा पाण्याचा दबावाने, पाईप लाईनचा पाणी पुरवठा करण्याचा दबाव १३ केव्ही असल्याने पाईप लाईन फुटण्याचे प्रमाण काही वर्षा पासून वाढले आहे. संबंधित ग्रामस्थांनी या पाईप लाईन सतत फुटत असल्याची माहिती औद्योगिक वसाहती कार्यालयाला कळवूनही या पाईप लाईन देखभाल दुरुस्तीचे काम वेळेवर केले जात नाही.

ठेकेदाराचा वेळेवर काम करायला हलगर्जीपणा

तसेच पाईप लाईन सतत फुटून मोठ्या अपघाताची कल्पना असून पण संबंधित अधिकारी वर्गा कडून या घटनेची योग्य दखल घेतली जात नाही. यामुळे पुढील काही काळात पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. तसेच (दि.३) ऑगस्ट रोजी तामखडा येथे पाईप लाईन फुटीची घटना घडली होती. शनिवार (ता. ८) रोजी पाटस हद्दीतील महामार्गालगत असलेल्या दत्त मंदिर जवळ फुटल्याने पाच दिवसात दुसऱ्यांदा फुटल्याने पाईप लाईनच्या क्षमता संदर्भात मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच पाटसमध्ये पाईप लाईन फुटल्यामुळे जीवितहानी आणि वित्त हानी झाली आहे. या घटनेमध्ये अनेक गोर-गरीब लोकांचे कुटुंब उध्वस्त झाले होते, आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

पाईप लाईनच्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया

यावेळी संबंधित विभागा कडून नुकसानीची भरपाई पण दिली जात नाही. संबंधित पाईप लाईनच्या लगत असलेले व्यावसायिक, कामगार, नागरिक आणि कुटुंब यांनी वेळोवेळी संबंधित घटनेची माहिती औद्योगिक वसाहती कार्यालयाला कळविले जाते. तसेच पाईप लाईन अनेक ठिकाणी छोटे मोठे छिद्र पडून पाणी गळती होत आहे. देखभाल दुरुस्तीचे काम दिलेला ठेकेदार वेळेवर काम करायला हलगर्जी पणा करत आहे असे आरोप व्यावसायिक व नागरिक करत आहेत. तसेच दोन तासांनी पाणी पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम संथ गतीने करण्यात येत आहे.

 औद्योगिक वसाहतीला राज्य सरकार कडून वेळेवर पाणी पुरवठा केला जात आहे. पण औद्योगिक वसाहतीला दिले जाणारे पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होत आहे की नाही? पाईप लाईनच्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे, औद्योगिक वसाहतीला दिलेल्या पाण्याच्या नियोजनाची व पाईप लाईन वैधता संदर्भात चौकशी करावी अशी मागणी पाटस मधील ग्रामस्त करत आहेत.

लवकरच नवीन पाईप लाईनचे काम सुरू

 वरवंड येथून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन खूप वर्षांची झाली आहे. यामुळे वरवंड येथील तलाव ते पाटस टोल पर्यंत नवीन पाईप लाईनचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला असून लवकरच नवीन पाईप लाईनचे काम सुरू करण्यात येईल.

मिलिंद पाटील (उप-अभियंता, कुरकुंभ औद्योगिक वसाहत)