christmas sale started on amazon flipkart up to 40 percent discount on these smartphones know more
Amazon, Flipkart वर सुरू झालाय ख्रिसमस सेल, या स्मार्टफोन वर मिळतोय 40% पर्यंत डिस्काऊंट

Flipkart आणि Amazon वर आता ख्रिसमस सेल सुरू झालाय. यात पुन्हा एकदा स्मार्टफोन खरेदी करण्याची आयती संधीच चालून आली आहे.

नवी दिल्ली : ख्रिसमस आणि नव्या वर्षात जर तुम्ही फोन घेण्याच्या विचारात असाल तर आपल्यासाठी गुड न्यूज आहे. ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) एका नवीन सेल घेऊन आले आहेत. हा सेल १८ डिसेंबरपासून सुरू झालाय. ज्यात लोकं भरपूर शॉपिंग करण्यात गुंतले आहेत. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. हा सेल २२ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जाणून घेऊया अशा स्मार्टफोनबाबत ज्यावर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आपण आपली गरज आणि आवडीनुसार काहीही खरेदी करू शकता.

सॅमसंग एम 51

Amazon वर अनेक स्मार्टफोनवर चांगल्या डिल्स मिळत आहेत. Samsung M51 स्मार्टफोन आपण या सेलमध्ये 24,999 रुपयांऐवजी 22,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर 10,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंटही ऑफर करण्यात येत आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 7000 एमएएचची पावरफुल बॅटरी दिली आहे. स्मार्टफोन 6.7 इंचाची full HD+ Super AMOLED Plus इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसह 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिलं आहे. इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढविण्याची . हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारित वन युआय तंत्रज्ञानावर चालतो. यात 64MP चा प्रायमरी सेन्सर, 12MP का सेकंडरी कॅमेरा आणि 5MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि आणि 5MP चा मॅक्रो लेन्स दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 32M चा कॅमेरा दिला आहे.

रेडमी नोट 9 प्रो

ॲमेझॉन सेल मध्ये या फोनचे 4GB + 64GB वेरिएंट 13,999 रुपयांना खरेदी करता येईल. या सेबतच साथ ॲमेझॉन या फोनवर 11,750 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. रेडमी नोट 9 मध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमऱ्यासह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 13 मेगापिक्सल AI फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये मीडियाटेक हीलियो जी 85 प्रोसेसर आहे. हँडसेट अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 11 वर चलतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमसह 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. हँडसेट मध्ये 6.53 इंच फुल एचडी+ डॉट डिस्प्ले दिला आहे. फोनला पावरसाठी 5020mAh ची बॅटरी दिली आहे. फोनसोबत 22.5 वॅट फास्ट चार्जर येतो.

वनप्लस 8 टी

कंपनी ने या फोनची ओरिजनल किंमत 42,999 रुपये लिस्ट केली आहे. तथापि HDFC बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट EMI आणि डेबिट EMI ट्रांजेक्शन्स वर पेमेंट केल्यास 2,000 रुपयांचे तात्काळ डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय 10,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंटही मिळत आहे. वनप्लस 8T मध्ये 6.55 इंचाचा 120Hz AMOLED फ्लॅट डिस्प्ले असून याचा ब्राइटनेस 1,100 एनआईटी, 4,500 एमएएचच्या बॅटरीसाठी 65W फास्ट चार्जर आणि मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. कंपनी ने नव्या वनप्लस 8T कॅमेरा मॉड्युलला चार कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह दिले आहेत.

वनप्लस नॉर्ड

या फोनच्या 8GB + 128GB वेरियंटची किंमत ॲमेझॉन सेल मध्ये 27,999 रुपये आहे. तथापि आपण HDFC बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट EMI आणि डेबिट EMI ट्रान्झॅक्शन्स वर 1,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. सोबतच आपण 10,650 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काऊंटही घेऊ शकता. हा फोन होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह येतो, जो अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus 8T सारखाच आहे. हा स्मार्टफोन 5G सपोर्ट आणि 90Hz डिस्प्ले सह येतो. फोन मध्ये 4G LTE आणि स्टँडर्ड LCD पॅनल दिलं आहे. वनप्लसच्या या 5जी फोन मध्ये 64 मेगापिक्सल क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Nord N10 5G मध्ये 4,300mAh ची बॅटरी असून ती Warp Charge 30T फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह येते. फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या मागील बाजूस दिला आहे.

रेडमी 9 प्राइम

ॲमेझॉन सेल मध्ये 4GB + 64GB वेरियंट फोन आपण 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन चार कलर ऑप्शन मध्ये येतो, ज्यात मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराइज फ्लेयरचा समावेश आहे. फोन मध्ये 6.53 इंचाचा फुल HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. यात मीडियाटेक हेलियो G80 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्‍टोरेज आहे. इंटरनल स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढविता येते. कॅमेऱ्या बाबत सांगायचं झालं तर या फोनच्या मागील बाजूस चार कॅमरे दिले आहेत. यात 13 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या सेन्सरचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. रेडमीच्या या बजेट फोनची बॅटरी 5020mAh ची आहे, जी 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या मागील बाजूस आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10

79,999 रुपयांत लाँच झालेला हा फोन आपण फ्लिपकार्ट सेल मध्ये 54,999 रुपयांना विकत घेऊ शकता. ही खूपच चांगली डिल आहे. याशिवाय ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत 13,200 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंटही मिळणार आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरियंट मध्ये आहे. यात 6.3 इंचाचा Infinity-O Dynamic AMOLED डिस्प्ले आहे. याच्या स्क्रिनचे रिझोल्युशन 2280×1080 पिक्सल आहे. या स्मार्टफोन मध्ये Exynos 9825 SoC प्रोसेसर आहे. फोन अँड्रॉइड 9 आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमसह लाँच झाला होता. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3,500mAh ची बॅटरी आहे. यात 25 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

मोटो वन फ्युजन प्लस

जर तुम्ही स्टॉक अँड्रॉइड फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आपण हा फोन SBI बँक कार्ड ऑफर सह फ्लिपकार्ट सेल मध्ये15,249 रुपयांना खरेदी करू शकता. तर एक्सचेंज ऑफरमध्ये हाच फोन आपल्याला 14,200 रुपयांना विकत घेता येईल. One Fusion+ स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा पंच होल डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर दिला आहे. अधिक काळ फोन सुरू राहण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी आहे. याची बॅटरी 15W टर्बोपावर चार्जिंगला सपोर्ट करते. One Fusion+ स्मार्टफोन मध्ये मोटोरोला कंपनीने पॉप-अप सेल्फी कॅमेरा मकॅनिजम आणला आहे. फोन मध्ये नॉचलेस फुलव्यू डिस्प्ले दिला आहे. मोटोरोलाच्या या नव्या फोनच्या रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनरशिवाय क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे.

मोटो जी 5 जी

जर आपण 5G फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्ट वर आपल्याला हा फोन 19,749 रुपयांत मिळेल. तथापि, यासाठी आपल्याजवळ SBI बँक कार्ड असायला हवं. भारताता या फोनची ऑफ सेल किंमत 24,999 रुपये आहे. याची वैशिष्ट्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750जी चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी आहे. फोन मध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. यात होल-पंच डिझाइनसह 6.7 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले येतो. Moto G 5G फोन या महिन्याच्या सुरुवातीला युरोप मध्ये लाँच झाला होता आणि आता हा भारतीय बाजारात उपलब्ध आहे. OnePlus Nord नंतरचा आता हा देशातला सर्वात स्वस्त 5जी फोन आहे.

गुगल पिक्सल 4a

फ्लिपकार्ट सेल दरम्यान आपल्याला या फोन वर काही डायरेक्ट डिस्काऊंट मिळणार नाही. पण, SBI बँक कार्ड ऑफर आणि 13,200 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काऊंटचा फायदा घेता येणार आहे. हा फोन आपण 31,999 रुपयांना विकत घेऊ शकता. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित आहे आणि हा अँड्रॉइड 11 वर अपग्रेडेबल आहे. यात 5.81-इंच फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सल) OLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 6GB LPDDR4x रॅम सह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी याच्या मागच्या बाजूला 12.2MP चा कॅमेरा आणि फ्रंटला 8MP चा कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेऱ्यात OIS चा सपोर्टही मिळणार आहे. याची इंटरनल मेमरी 128GB आहे, ची कार्डच्या मदतीने वाढविता येणार नाही. कनेक्टिविटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ आणि एक USB टाइप-C पोर्टचा ऑप्शन दिला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर मागच्या बाजूस आहे आणि याची बॅटरी 3,140mAh ची आहे. तिला 18W फास्ट चार्जिंग का सपोर्टही दिला आहे.

आसूस आरओजी फोन 3

हा एक लेटेस्ट गेमिंग स्मार्टफोन आहे, जो फ्लिपकार्ट सेल मध्ये 5,000 रुपयांच्या डिस्काऊंट सह 44,999 रुपयांत उपलब्ध होईल.या शिवाय SBI कार्ड्सने पेमेंट केल्यास फोन खरेदीवर10 टक्के तात्काळ डिस्काऊंटही मिळेल. फोन मध्ये AirTrigger 3 अल्ट्रासोनिक बटण आणि ड्युअल फ्रंट स्पीकरचा समावेश आहे. हा फोन डुअल-सिम (नॅनो), अँड्रॉइड 10 वर आधारित आहे. यात 19.5:9 आस्पेक्ट रेशियो, 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 270 हर्ट्ज टच सँपलिंग रेट आणि HDR10+ सपोर्ट सह 6.59 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले 2.5डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन सह येतो आणि यात टीयुवी लो ब्लू लाइट सोल्युशनसह डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून फ्लिकर रिडक्शन-सर्टिफाइड टेक्नॉलॉजीचा अंतर्भावही केला आहे.

आयफोन एक्सआर

जर आपणही आयफोनच्या प्रेमात असाल तर यावेळी फ्लिपकार्ट सेल आपल्यासाठी विशेष असणार आहे. सेल मध्ये आयफोन एक्सआर (iPhone XR) वरही चांगली ऑफर मिळत आहे. सेल दरम्यान हा फोन 38,999 रुपयांना मिळणार आहे म्हणजेच आयफोन 47,900 रुपयांहून कमी 10,000 रुपयांची सूटही मिळणार आहे. फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफर अंतर्गत 15,150 रुपयांची ऑफरही देण्यात आली आहे.या फोन मध्ये 6.1 inches (15.49 cm) आणि 828 x 1792 pixels चा डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. यात 4.0 का रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. Apple चा हा हँडसेट iOS v12.0 ऑपरेटिंग सिस्टम वर चलतो आणि हँडसेटला पावर देण्यासाठी 3110 mAh ची बॅटरी दिली आहे.

रियलमी नारजो 20 प्रो

फ्लिपकार्ट सेल दरम्यान Realme Narzo 20 Pro स्मार्टफोन 13,999 रुपयांच्या मूळ किंमतीला मिळेल. याची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. याशिवाय SBI कार्ड्सने पेमेंट केल्यास फोन खरेदीवर 10 टक्के तात्काळ डिस्काऊंटही मिळेल. या फोन मध्ये 6.5 इंच फुल HD+ डिस्प्ले दिला आहे. फोन मध्ये मीडियाटेक हेलियो G95 प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोनचं स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढविता येईल. या गेमिंग स्मार्टफोन मध्ये मागील बाजूस चार कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सलचा एक आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये 4500 mAhची बॅटरी ती 65 वॅट सुपर डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

रियलमी 6

फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल में Realme 6 स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या मूळ किंमतीत उपलब्ध आहे. नेहमीच्या किंमतीच्या तुलनेत या फोन वर सेल मध्ये एक हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे याशिवाय SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास खरेदीवर 10 टक्के अतिरिक्त डिस्काऊंटही मिळेल. सोबतच फोन दर महिन्याला 1,334 रुपयांच्या नो-कॉस्ट-ईएमआय या स्टँडर्ड ईएमआयवरही खरेदी करता येईल. 90 Hz रिफ्रेश रेट के साथ 6.5 इंच फुल HD प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन मध्ये मीडियाटेक हेलियो G90T प्रोसेसर, 8 जीबी तक रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन आहे. इंटरनल स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. इस फोन मध्ये मागच्या बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सलचा एक आणि 2 मेगापिक्सलचे दोन अन्य सेन्सरही आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.