1/12
देव दिवाळीच्या उत्सवाला नरेंद्र मोदी काल वाराणसीच्या दौऱ्यावर होते. हिंदू मान्यतेनुसार कार्तिक महिन्यात पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. यावेळी देव दिवाळी गंगा नदीच्या किनारी लाखो दिवे लावून साजरी करण्यात आली.

2/12
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मतदारसंघात ५० किमीचे अंतर विमानाने तर ४० किमीचे अंतर रस्तेमार्गाने दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वेळी फेब्रुवारीत वाराणसीला आले होते. लॉकडाऊननंतर प्रथमच ते वाराणसीला आले होते. पंतप्रधानांचा वाराणसीचा हा २३ वा दौरा होता.

3/12
4/12
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीत देव दिवाळीचे आयोजन पारंपारिक पद्धतीने करण्यात येते. देवदेवतांनी शंकराच्या या नगरात देव दिवाळी साजरी केली होती अशी मान्यता आहे तेव्हापासून या उत्सवाला देवदिवाळी असे संबोधले जाते.

5/12
चेत सिंह घाट या ठिकाणी लेझर शोच्या माध्यातून देव दिवाळीचे महत्त्व सांगण्यात आले तर विश्वनाथ कॉरिडोरचे निरिक्षण केल्यानंतर राजघाटावर पहिला दिवा लावून देव दिवाळीला पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाली.

6/12
कोरोना महामारीत दरम्यान प्रथमच पंतप्रधान बनारसच्या दौऱ्यावर आहेत. तथापि अनेकदा पंतप्रधान आभासी पद्धतीने (व्हर्चुअली) विविध कार्यक्रमांत सहभागी झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सरंक्षक दलांनी फौजफाटा तैनातीसोबतच ड्रोन कॅमेरे लावण्यात आले होते. या ठिकाणच्या लोकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

7/12
पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दाखल झाले आणि मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर पीएम कॉरिडोर प्रकल्पाचा आढावा घेतला सोबतच दीपदानही केले.

8/12
राजघाटावर उपस्थितांशी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, आज गंगामाईच्या सानिध्यात काशी दीपोत्सव साजरा करत आहे. मलाही महादेवाच्या आशीर्वादाने या दीपोत्सवात गंगेत स्नान करण्याचे सौभाग्य लाभले. काशीसाठी आणखी एक विशेष असा महत्त्वाचा दिवस आहे. मन की बात मध्ये परवाच्या दिवशी मी याचा उल्लेख केला होता. १०० वर्षांपूर्वी माता अन्नपूर्णेची मूर्ती जी काशीहून चोरी झाली होती, ती पुन्हा लवकरच काशीला येणार आहे.

9/12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपला मतदार संघ वाराणसीचा दौरा केला. कार्तिक पौर्णिमेच्या पावन प्रसंगी वाराणसीच्या घाटावर आस्था आणि श्रद्धेचे अनोखा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्रुझवर चेता सिंह घाटावर आयोजित लेझर शो चा आनंद घेतला. पंतप्रधान यावेळी पूर्णपणे शिवभक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. त्यांनी शिवभक्तीशी संबंधित एक व्हिडिओही ट्विटरवर शेअर केलाय.

10/12
लेझर शो पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संत रविदास घाटावर पोहोचले. तेथे त्यांनी संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पंतप्रधान मोदी भगवान बुद्धांच्या उपदेश स्थळी सारनाथ येथे पोहोचले. या ठिकाणीही पंतप्रधानांनी लेझर आणि साऊंड शो पाहिला. या शो ला अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.

11/12
यापूर्वी राजघाटावर पंतप्रधानांनी काशीवासियांना संबोधित करताना म्हटले होते की, काशीची भक्ती-शक्ती कोणीही बदलू शकत नाही. काशई विश्वनाथ धाम येथे येणाऱ्या भक्तांसाठी विहंगम दर्शनाची परिकल्पना लवकरच प्रत्यक्षात अवतरणार आहे.

12/12
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशी विश्वनाथ धाम योजना ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करून देशातील देदीप्यमान प्रतिकात्मक स्वरुपात लोकार्पण करण्यात येईल. साजघाटावर पंतप्रधान म्हणाले की, १०० वर्षांहून अधिक वर्ष चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती काशीहून चोरी झाली होती, ती पुन्हा काशीत दाखल होणार आहे. माता अन्नपूर्णा पुन्हा एकदा आपल्या घरी परतणार आहे.