फोटो गॅलरी
Published: Sep 14, 2021 07:23 PMGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ – गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos
गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात पाच दिवसाच्या गौरी गणपतीला आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात निरोप(Ganpati Immersion In Raigad And Ratnagiri) देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर(Corona) सामाजिक भान राखत व शासन नियमांचे पालन करीत घरगुती व सार्वजनिक गणरायाचे विसर्जन(Ganpati Immersion) मोठ्या मंगलमय व भक्तीपुर्ण वातावरणात करण्यात आले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यंदा ढोल, ताशा, वाद्यवृंद व मिरवणूक काढता आल्या नाहीत. यावर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून विसर्जन स्थळी होणारी पूजा घरीच करण्यात आली. अनेकांनी श्रीची मूर्ती, शाडू व पर्यावरणपूरक घेणे पसंत केले. अशा मूर्तींचे विसर्जन ही घरीच करणे लोकांनी पसंत केले.