1/8
भारतीय वायुसेना जगातील चौथ्या क्रमाकांची सर्वात मोठी वायुसेना आहे. भारतीय वायुसेनेत ९०० लढाऊ एअरक्राफ्ट्स आहेत तर एकूण सक्रिय विमानांची संख्या १,७२० आहे. फायटर एअरक्राफ्टबाबत सांगायचं झालं तर भारतीय वायुसेनेकडे आजच्या घडीला सात फायटर एअरक्राफ्ट आहेत ज्यात सुखोई एसयु-३० एमकेआय, तेजस, मिराज २०००, मिग-२९, मिग -२१ आणि जग्वार यांचा समावेश आहे.
स्वदेशी बनावटीच्या लढाऊ तेजस विमानाकडून वायुसेनेला खूपच अपेक्षा आहेत. जाणून घेऊयात भारतीय वायुसेनेकडे किती फायटर एअरक्राफ्ट आहेत. त्यांची क्षमता किती आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. जाणून घेऊया.
भारतीय वायुसेना जगातील चौथ्या क्रमाकांची सर्वात मोठी वायुसेना आहे. भारतीय वायुसेनेत ९०० लढाऊ एअरक्राफ्ट्स आहेत तर एकूण सक्रिय विमानांची संख्या १,७२० आहे. फायटर एअरक्राफ्टबाबत सांगायचं झालं तर भारतीय वायुसेनेकडे आजच्या घडीला सात फायटर एअरक्राफ्ट आहेत ज्यात सुखोई एसयु-३० एमकेआय, तेजस, मिराज २०००, मिग-२९, मिग -२१ आणि जग्वार यांचा समावेश आहे. स्वदेशी बनावटीच्या लढाऊ तेजस विमानाकडून वायुसेनेला खूपच अपेक्षा आहेत. जाणून घेऊयात भारतीय वायुसेनेकडे किती फायटर एअरक्राफ्ट आहेत. त्यांची क्षमता किती आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. जाणून घेऊया.
2/8
सुखोई ३० एमकेआय रशियन सुखोई एसयु-३० एमकेआय भारतीय वायुसेनेत सर्वाधिक शक्तीशाली एअरक्राफ्ट मानले जाते. भारतीय वायुसेनेकडे २७२ सक्रिय सुखोई एसयु-३० एमकेआय आहेत. या एअरक्राफ्टमध्ये दोन इंजिन्स आहेत असून दोन पायलटची बसण्याची व्यवस्था आहे. यातील काही एअरक्राफ्ट ही सुपरसोनिक मिसाइल ब्राम्होस लाँच करण्यासाठी अपग्रेड करण्यात आली आहेत. सुखोई विमान ३,००० किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकते. याची क्रूझ रेंज ३,२०० किलोमीटरपर्यंत आहे. कॉम्बेट रेडियस १,५०० किलोमीटर आहे. वजनाने जड असूनही हे लढाऊ विमान आपल्या वेगवान गतीमुळे प्रसिद्ध आहे. हे विमान आकाशात २,१०० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते.

3/8
तेजस ब्राम्होस एनजी २०१६ साली हे लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत दाखल झाले. तेजसला या आधी मिग- २१ बायसनची जागा घेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेत आजही २० तेजस सक्रिय आहेत. आता ४० तेजस एअरक्राफ्टची ऑर्डर देण्यात आली आहे. तेजसचे वजन १२ टन असून याची लांबी १३.२ मीटर आहे. तेजसची क्षमता एअर टू एअर मिसाइल, लेजर गाइडेड मिसाइल आणि मेक इन इंडिया अस्त्र मिसाइल आहे. तेजस मल्टीरोल विमान असून याची संरचना एखाद्या व्हिडिओ गेमसारखी आहे म्हणून याचे उड्डाण सहज आणि सुलभ होते.

4/8
मिराज २००० फायटर जेट मिराज २००० विमानाच्या सहाय्यानेच २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताने पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदचा तळ बाँबने उद्धवस्त केला होता. भारतीय वायुसेनेत आजमितीला ५७ मिराज २००० जेट सुसज्ज आहेत. मिराज २००० मल्टीरोल, सिंगल इंजर आणि सिंगल सीट असलेले जेट आहे, याचा वेग २,४९५ किमी प्रतितास आहे. या लढाऊ विमानाची खासियत म्हणजे हे विमान कोणत्याही देशाच्या सीमेच्या आत घुसून मारा करू शकते. या विमानात सहजतेने एखाद्या देशाच्या सीमेच्या आत घुसून आपले लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. हे असे विमान आहे जे हवेतून जमिनीवर मारा करू शकते. या सोबतच यात हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र सांभाळण्याची क्षमता आहे.

5/8
मिग-२९ हे लढाऊ विमान असून यात दोन इंजिन्स आणि फक्त एकच सीट आहे. या फायटर जेट विमानाचा वेग २,४४५ किमी प्रतितास आहे. भारतीय वायुसेनेत आजच्या घडीला ६९ कार्यरत मिग - २९ जेट विमाने आहेत. मिग - २९च्या सहाय्याने हवेतल्या हवेत, हवेतून जमिनीवर आणि अँटी शिपिंगमुळे ऑपरेशन सुलभ होते. हे विमान ग्लास कॉकपिट, डिजिटल स्क्रीन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याला धोबीपछाड देण्यात या फायटर विमानाची खूपच मदत झाली होती. मिग- २९ विमान अपग्रेड करण्यात आले आल्यानंतर याचा वेग आणखीन वाढला आहे.

6/8
7/8
स्पेसकॅट-जग्वार एसईपीईसीएटी (SEPECAT) जग्वार एक सुपरसोनिक कमी उंचीवर उडणारे लढाऊ विमान आहे. याच्या हाय-विंग लोडिंग डिझाइनमुळे कमी उंचीवर एक स्थिर उड्डाण आणि युद्धसामग्री घेऊन जाणे सुलभ होते. विमानावर असलेल्या पंखांमुळे त्याला उत्तम ग्राउंड क्लियरन्स मिळतो आणि जमिनीवर मारा करणे यामुळे अधिक सोपे होते. एका जग्वार विमानाचे वजन ७७०० किलोग्राम आहे. हे विमान १,७०० किमी प्रतितास या वेगाने उड्डाण करते. याची क्षमता ३० एमएमचे दोन एडीईएन किंवा डीईएफए गोळे अशी आहे. याशिवाय साडेचार हजार किलोग्राम वजनाचे हवेतून हवेत मारा करणारे आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रॉकेटसोबतच विविध प्रकारची क्षेपणास्त्रे यात लोड करण्याची क्षमता आहे.

8/8
राफेल विमान

राफेल विमान देशात येण्याआधीच खूप चर्चेत राहिलं. पण भारत सरकारने सर्व आरोप फेटाळत या विमानाचा वायुसेनेत सन्मानपूर्वक समावेश केला. राफेलचा वेग २,१३० किमी/ तास आणि ३७०० किमी. पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. राफेल विमान हवेत झेपावल्यानंतर ६० तास उड्डाण करू शकते.
हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे असून वायुसेनेने याला प्रथम पसंती दिली आहे. हे कोणत्याही युद्धात सहभागी होण्यासाठी सक्षम आहे. हे एका मिनिटात ६०,००० फूट उंच झेपावू शकते. यात ४.५ जनरेशनच्या दोन इंजिन्सचा समावेश आहे.
राफेल विमान राफेल विमान देशात येण्याआधीच खूप चर्चेत राहिलं. पण भारत सरकारने सर्व आरोप फेटाळत या विमानाचा वायुसेनेत सन्मानपूर्वक समावेश केला. राफेलचा वेग २,१३० किमी/ तास आणि ३७०० किमी. पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. राफेल विमान हवेत झेपावल्यानंतर ६० तास उड्डाण करू शकते. हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे असून वायुसेनेने याला प्रथम पसंती दिली आहे. हे कोणत्याही युद्धात सहभागी होण्यासाठी सक्षम आहे. हे एका मिनिटात ६०,००० फूट उंच झेपावू शकते. यात ४.५ जनरेशनच्या दोन इंजिन्सचा समावेश आहे.