1/5
Indian Navy Day 2020: 
नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबरलाच साजरा करण्यात येतो. या दिवशी नौदलाच्या शूरवीरांना मानवंदना देण्यात येते. नौदल दिन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने विजय मिळवला होता. या दिवसाची आठवण म्हणून नौदल दिन साजरा करण्यात येतो. ३ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने आपल्या हवाई हद्दीत आणि सीमाभागात हल्ला केला होता. या हल्ल्याने १९७१ च्या युद्धाला प्रारंभ झाला होता. पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्यासाठी 'ऑपरेशन ट्रायडंट' राबविण्यात आलं.
Indian Navy Day 2020: नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबरलाच साजरा करण्यात येतो. या दिवशी नौदलाच्या शूरवीरांना मानवंदना देण्यात येते. नौदल दिन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने विजय मिळवला होता. या दिवसाची आठवण म्हणून नौदल दिन साजरा करण्यात येतो. ३ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने आपल्या हवाई हद्दीत आणि सीमाभागात हल्ला केला होता. या हल्ल्याने १९७१ च्या युद्धाला प्रारंभ झाला होता. पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्यासाठी 'ऑपरेशन ट्रायडंट' राबविण्यात आलं.
2/5
हे ऑपरेशन पाकिस्तानी नौदलाचे कराची स्थित मुख्यालयाला लक्ष्य ठेवून करण्यात आलं. एक क्षेपणास्त्र नौका आणि दोन युद्धनौका असलेल्या गटाने कराचीतल्या किनाऱ्यावरील जहाजांच्या ताफ्यावर हल्ला केला. या युद्धात प्रथमच जहाजांवर मारा करणाऱ्या अँटी शीप क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक युद्धनौका नेस्तनाबूत करण्यात भारतीय नौदलाला यश आलं. या दरम्यान पाकिस्तानचे तेलाचे टँकरही उद्धवस्त करण्यात आले.
हे ऑपरेशन पाकिस्तानी नौदलाचे कराची स्थित मुख्यालयाला लक्ष्य ठेवून करण्यात आलं. एक क्षेपणास्त्र नौका आणि दोन युद्धनौका असलेल्या गटाने कराचीतल्या किनाऱ्यावरील जहाजांच्या ताफ्यावर हल्ला केला. या युद्धात प्रथमच जहाजांवर मारा करणाऱ्या अँटी शीप क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक युद्धनौका नेस्तनाबूत करण्यात भारतीय नौदलाला यश आलं. या दरम्यान पाकिस्तानचे तेलाचे टँकरही उद्धवस्त करण्यात आले.
3/5
सात दिवस धगधगत होता कराची तेल डेपो :

कराची तेल डेपो उद्धवस्त झाल्याने पाकिस्ताच्या नौदलाचे कंबरडेच मोडले होते. कराचीच्या तेल टँकर्समध्ये लागलेल्या आगीचे लोट ६० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. एवढे या आगीचे स्वरूप भीषण होते. ही आग एवढी भीषण होती की, सात दिवस कराचीचा तेल डेपो धगधगत होता.
सात दिवस धगधगत होता कराची तेल डेपो : कराची तेल डेपो उद्धवस्त झाल्याने पाकिस्ताच्या नौदलाचे कंबरडेच मोडले होते. कराचीच्या तेल टँकर्समध्ये लागलेल्या आगीचे लोट ६० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. एवढे या आगीचे स्वरूप भीषण होते. ही आग एवढी भीषण होती की, सात दिवस कराचीचा तेल डेपो धगधगत होता.
4/5
नौदल दिन (Navy Day) ४ डिसेंबरलाच का साजरा करतात? :

नौदल दिन १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ भारतीय नौदलाच्या सामर्थ्य आणि शौर्याची आठवण म्हणून साजरा करण्यात येतो. 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत ४ डिसेंबर, १९७१ ला भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराचीतील नौदलच्या तळावर हल्लाबोल केला होता. या ऑपरेशनच्या विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबरला दरवर्षी नौदल दिन साजरा केला जातो.
नौदल दिन (Navy Day) ४ डिसेंबरलाच का साजरा करतात? : नौदल दिन १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ भारतीय नौदलाच्या सामर्थ्य आणि शौर्याची आठवण म्हणून साजरा करण्यात येतो. 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत ४ डिसेंबर, १९७१ ला भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराचीतील नौदलच्या तळावर हल्लाबोल केला होता. या ऑपरेशनच्या विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबरला दरवर्षी नौदल दिन साजरा केला जातो.
5/5
भारतीय नौदलाचा इतिहास :

भारतीय नौदलावर (Indian Navy) समुद्र तटाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याची स्थापना १६१२ रोजी करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांच्या संरक्षणाच्या उद्देशाने East India Company's Marine च्या रुपात सैन्याची स्थापना करण्यात आली होती. यानंतर याचे रॉयल इंडियन नौदल असे नामकरण करण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नौदलाची बांदणी करण्यात आली आणि त्यानंतर भारतीय नौदल असे नामकरण करण्यात आले.
भारतीय नौदलाचा इतिहास : भारतीय नौदलावर (Indian Navy) समुद्र तटाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याची स्थापना १६१२ रोजी करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांच्या संरक्षणाच्या उद्देशाने East India Company's Marine च्या रुपात सैन्याची स्थापना करण्यात आली होती. यानंतर याचे रॉयल इंडियन नौदल असे नामकरण करण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नौदलाची बांदणी करण्यात आली आणि त्यानंतर भारतीय नौदल असे नामकरण करण्यात आले.